विडी कामगारनगर खून प्रकरणातील पाचही संशयित जेरबंद ; गुन्हे शाखा युनिट-१ ची दमदार कामगिरी
विडी कामगारनगर खून प्रकरणातील पाचही संशयित जेरबंद ;
गुन्हे शाखा युनिट-१ ची दमदार कामगिरी
नाशिक प्रतिनिधी
आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ कारणावरून झालेल्या खून प्रकरणी पाच संशयितांच्या शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने मुसक्या बांधल्या आहेत.
या संदर्भात प्राप्त माहिती अशी की,दिनांक २५/११/२०२४ रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून आडगाव पोलिस ठाण्यात गु. र. नं ३४५/२०२४ भारतीय न्याय संहीता कलम १०३(१),१८९ (४), १९०,१९१, (२),१९१, (३),३५१ (२), ३५१ (३),३५२ अन्वये दि. २५/११/२०२४ रोजी गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयातील पाहिजे आरोपीतांचा शोध घेण्यासाठी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे तसेच गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहा. पो. आयुक्त संदिप मिटके, यांनी गुन्हेशाखा युनिट १ यांना मार्गदर्शन केले होते.
त्या अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट १ चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पाहिजे आरोपीतांचा शोध घेत असतांना पोअं/२०६९ विलास चारोस्कर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी हे नगरसुल येथे आहे. वपोनि मधुकर कड यांना ही बातमी कळताच त्यांच्या आदेशान्वये गुन्हे शाखा युनिट क. कडील एक पथक तयार करून आरोपीतांचा शोध घेण्यासाठी नगरसुल ता. येवला येथे रवाना केले होते. या पथकाने आरोपीतांचा राजापुर रोड, पिंपळखुटे ता. येवला, जि. नाशिक परिसरात शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सुरज रविंद्र मोहीते वय २२ वर्ष, रविंद्र साहेबराव मोहीते वय ४३ वर्ष व एक महीला, रा. रा. फ्लॅट नं.४ विहंग सोसायटी, बि विंग विडी कामगार नगर, आडगावं नाशिक असे सांगून त्यांना गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याबाबत कबुली दिली आहे.
तसेच गुन्हेशाखा युनिट १ चे पोलीस अधिकारी व अंमलदार पाहिजे आरोपीतांचा शोध घेत असतांना पोअं नितीन जगताप यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी हे जैन मंदीर विल्होळी येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. सदरची बातमी वपोनि मधुकर कड़ यांना देवून त्यांच्या आदेशान्वये गुन्हे शाखा युनिट क. १ कडील एक पथक तयार करून आरोपीतांचा शोध घेणेकामी जैन मंदीर विल्होळी येथे रवाना केले होते. नमूद पथकाने आरोपीलांचा जैन मंदीर विल्होळी परिसरात शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव महिंद्र उत्तम जाधव वय ३८ वर्ष रा. स्वामी समर्थ केंद्राजवळ, विडीकामगार नगर, आडगावं, नाशिक असे सांगितले. तसेच एक महिला आरोपी ही मुंबईनाका परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून सदर महिलेस ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना वर नमूद गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याबाबत कबुली दिली आहे. वरील पाचही आरोपीतांना आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउपनि चेतन श्रीवंत, पोहवा महेश साळुंके, रविंद्र आढाव, प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, विशाल काठे, प्रदिप म्हसदे, विशाल देवरे, पोअं नितीन जगताप, विलास चारोस्कर, आप्पा पानवळ, पोअं मुख्तार शेख, राम बर्डे, राहुल पालखेडे, मिलींदसिंग परदेशी, पोल्या देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, राजेश लोखंडे, मपोअं अनुजा येलवे, मनिषा सरोदे व चालक श्रेणी पोउपनि किरण शिरसाठ व पोहवा सुकाम पवार यांनी केली आहे.