नाशिकरोड येथे मराठा सोयरीक संस्थेचा मोफत वधू वर मेळावा; अखंड मराठा समाज व मराठा सोयरिक संस्थेचे आयोजन
नाशिकरोड येथे मराठा सोयरीक संस्थेचा मोफत वधू वर मेळावा;
अखंड मराठा समाज व मराठा सोयरिक संस्थेचे आयोजन
नाशिकरोड प्रतिनिधी
अखंड मराठा समाज व मराठा सोयरीक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नाशिकरोड येथे मोफत मराठा वधू वर परिचय मेळावा आयोजित केला असल्याची माहिती विठ्ठल प्रसाद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयकुमार गायधनी, महाराष्ट्र माझा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष श्री विकास (बंटी ) भागवत, अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश सरचिटणीस योगेश नाटकर पाटील,मराठा सोयरीक संस्थेचे संस्थापक अशोक कुटे यांनी दिली आहे.
आज काल मुलांना लग्नासाठी लवकर मुली मिळत नाही, त्यांचे लग्न जमत नाही. तसेच शेतकरी मुलांसोबत कोणीही लग्न करायला तयार होत नाही. आपले नातेवाईक मित्रपरिवार यांना देखील वेळ मिळत नसल्यामुळे कोणीही स्थळ दाखवण्यात आता मदत करत नाही.*म्हणून अशा वधू वर मेळाव्यांची दिवसेंदिवस गरज पडत आहे. मराठा सोयरीक संस्थेने आतापर्यंत 91 यशस्वी वधू वर मेळावे मोफत घेतले आहेत. या संस्थेकडून आतापर्यंत 4100 लग्न पार पाडलेले आहेत. त्यापैकी 600 लग्न हे विधवा,विदुर, घटस्फोटीत यांचे पार पडलेले आहेत.धर्मादाय कार्यालयात नाव नोंदणी केलेली शासनमान्य अशी ही संस्था आहे.
Advertisement
हा मेळावा नेहमीप्रमाणे मोफत असून 92 वा मेळावा शनिवार 30 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी १२ वाजता नाशिक रोड येथे कदम लॉन्स, (मुक्तिधाम मंदिरा जवळ) होणार आहे. तरी जास्तीत जास्त वधु वर पालकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन फकीरराव वाळुजी कदम, डी. जी. पाटील, शंकरराव सोमवंशी, रामनाथ मालुंजकर,शरद जगताप, धनंजय घोरपडे, छायाताई झाडे, राजेंद्र खताळे, राजाराम मुंगसे, अश्विनी महाले, चंद्रभान मते, विनोद पोखरकर, कमलेश कोते, प्रभाकर कड आदींनी केले आहे.
*या मेळाव्यासाठी येताना वधू- वरांनी स्वतः २ फोटो, बायोडाटा घेऊन पालकांसह मेळाव्यास यायचे आहे. अनेक वेगवेगळ्या तालुक्यातील व वेगवेगळ्या जिल्ह्यातील सर्व प्रकारचे स्थळे या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी 7020281282 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.