महाराष्ट्रातील उद्योजकता आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्याविषयी केंद्र सरकारने तात्काळ पावले उचलावीत; छावा क्रांतीवीर सेनेचे पंतप्रधानांना निवेदन
महाराष्ट्रातील उद्योजकता आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्याविषयी केंद्र सरकारने तात्काळ पावले उचलावीत;
छावा क्रांतीवीर सेनेचे पंतप्रधानांना निवेदन

नाशिक प्रतिनिधी
महाराष्ट्र हे प्रगत राष्ट्र असून देशाच्या आर्थिक प्रगतीचा मुख्य आधारस्तंभ आहे.ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्रातील उद्योजकता आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ पाऊले उचलावित अशा आशयाचे निवेदन छावा क्रांतीवीर सेनेने पंतप्रधानांना निवेदन दिले.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आपल्या दूरदृष्टीने देशाच्या आर्थिक,सामाजिक आणि औद्योगिक प्रगतीसाठी घेतलेल्या निर्णयांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.आपल्या नेतृत्वाखाली भारताने विकासाच्या नवनवीन उंची गाठल्या आहेत. महाराष्ट्रातील औद्योगिक विकास व रोजगारनिर्मितीच्या संदर्भात आहे. महाराष्ट्र राज्य हे देशाच्या आर्थिक प्रगतीचा मुख्य आधारस्तंभ राहिले आहे. येथील नैसर्गिक संसाधने, सांस्कृतिक समृद्धता, आणि मेहनती लोकसंख्या हे उद्योग विकासासाठी नेहमीच पूरक ठरले आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत अनेक गुंतवणूकदार व उद्योजक अडचणींचा सामना करत आहेत, ज्यामुळे अनेक उद्योग बंद पडले आहेत आणि रोजगार निर्मिती थांबली आहे.
महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक आर्थिक उत्पन्न देणारे राज्य असूनही, गेल्या काही वर्षांत औद्योगिक क्षेत्रात मोठी घसरण झाली आहे. कोरोनाच्या महामारीनंतर लघु व मध्यम उद्योगांना आर्थिक संकटाचा मोठा सामना करावा लागला आहे. बँक कर्जाचे ओझे, वीज आणि पाणी बिलांच्या वाढलेल्या दरांचा भार, तसेच GST संबंधित अडचणींमुळे उद्योगक्षेत्र अडचणीत सापडले आहे.महाराष्ट्रातील औद्योगिक घडी बसवण्यासाठी केंद्र सरकारने पुढील गोष्टींसाठी तातडीने पावले उचलावीत:“अशा आहेत प्रमुख मागण्या:* बंद पडलेल्या उद्योगांचे पुनर्वसन:महाराष्ट्रातील बंद पडलेल्या उद्योगधंद्यांच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करावा, जो या उद्योगांना पुन्हा कार्यक्षम करण्यासाठी काम करेल.* लघु व मध्यम उद्योगांसाठी सुलभ वित्तपुरवठा:लघु व मध्यम उद्योगांसाठी सुलभ बँक कर्ज, सबसिडी, आणि करसवलतीच्या योजना लागू कराव्यात.* स्थलांतरीत उद्योगांना आकर्षित करणे:महाराष्ट्र सोडून गेलेल्या उद्योगांना परत राज्यात आणण्यासाठी विशेष सवलतींची व प्रोत्साहनपर योजना तयार करावी.* महापालिका व ग्रामपंचायत हद्दीतील उद्योगांचे पुनरुज्जीवन:शहरी आणि ग्रामीण भागातील बंद पडलेल्या उद्योगांना शासनाच्या सवलतीत समाविष्ट करून ते कार्यक्षम करावे.*नवीन गुंतवणूकदारांसाठी सुलभ प्रक्रिया:गुंतवणूकदारांसाठी प्रक्रियांची सुलभता व पारदर्शकता निर्माण करून महाराष्ट्रात उद्योग सुरू करण्यासाठी आकर्षक धोरणे लागू करावीत.* रोजगारनिर्मितीसाठी नवीन धोरणांची अंमलबजावणी:नवीन रोजगार संधी निर्माण करणाऱ्या योजनांचा जलद गतीने अंमल करण्यात यावा.
अपेक्षा व इशारा:वरील मुद्द्यांवर तातडीने विचार करून योग्य उपाययोजना करण्यात यावी. १५ दिवसांच्या आत या समस्यांवर ठोस पावले उचलण्यात आली नाहीत, तर दिल्ली येथील आपल्या कार्यालयासमोर जनआंदोलन करावे लागेल.असा इशारा या निवेदनात दिला आहे.पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पुन्हा एकदा औद्योगिक व रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात अग्रस्थानी राहील, असा आमचा विश्वास आहे.
यावेळी निवेदन देताना छावा क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर,मराठा आंदोलन नानासाहेब बच्छाव,छावा क्रांतिवीर सेना केंद्रीय कार्याध्यक्ष अध्यक्ष विजय वाहूळे,युवक प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे, नाशिक जिल्हा प्रमुख आशिष हिरे,नाशिक महानगर प्रमुख योगेश गांगुर्डे,आयटी प्रदेश महासंपर्कप्रमुख वैभव दळवी, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख सागर जाधव,राहुल भालेराव आदी उपस्थित होते.