क्राईम

हिवरगाव पावसा येथे माघ पोर्णिमा यात्रा उत्सवा निमित्त जंगी कुस्त्यांचा हगामा;   नामांकित पैहीलवानाच्या उपस्थितीत रंगणार कुस्त्यांचा सामना


हिवरगाव पावसा येथे माघ पोर्णिमा यात्रा उत्सवा निमित्त जंगी कुस्त्यांचा हगामा 

 नामांकित पैहीलवानाच्या उपस्थितीत रंगणार कुस्त्यांचा सामना

 

रश्मी मारवाडी, नितीन भालेराव /संगमनेर

 

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शाने पवित्र भूमीत,संगमनेर तालुक्यातील प्रती जेजुरी म्हणून प्रसिद्ध असलेले हिवरगाव पावसा येथील श्री क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्टच्या माघ पोर्णिमा यात्रा उत्सवास २३ फेब्रुवारी पासून प्रारंभ झाला. दिनांक २३ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी या काळात सुरु असणाऱ्या या यात्रौत्सवात श्री क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यात राज्यस्तरीय अश्व प्रदर्शन,तसेच जागरण गोंधळाचा कार्यक्रम,कै.पांडुरंग मुळे(मांजरवाडीकर) तमाशा नाट्यमंडळाचा मोफत तमाशाच्या कार्यक्रमाबरोबर जंगी कुस्त्यांची दंगल आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.

जिल्ह्या बाहेरील नामांकित पहीलवानासोबत संगमनेर तालुक्यातील नामवंत पहिलवानांच्या उपस्थितीत दि. २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ५ या कालावधीत जंगी कुस्त्यांची दंगल आयोजीत करण्यात आली आहे.

Advertisement

विजेत्या पहीलवानास प्रथम क्रमांकासाठी श्री क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्टच्या वतीने देवगड केसरी गदा व शैलेंद्र दत्तात्रय गाडेकर,सिव्हिल इंजिनियर याचेकडून पाच हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.दुसरे पारितोषिक श्री क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्टच्या वतीने देवगड केसरी ट्रॉफी आणि सिताराम पंजा राऊत,जि.प.सदस्य याचेकडून तीन हजार शंभर रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहेत .तृतीय पारितोषिक श्री क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्टच्या वतीने देवगड मनाचा फेटा आणि अंकुश जनार्दन नरवडे याचेकडून दोन हजार शंभर रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

यात्रा उत्सवात आयोजीत जंगी कुस्त्यांचा हगामा स्पर्धेत जास्तीत जास्त पहीलवान कुस्तीगीर यांनी सहभागी होण्यासाठी गणेश दवंगे मो.९५०३८२२१३९ तर दशरथ गोसावी मो.८६६८६४८५२० यांच्या बरोबर संपर्क साधावा.तसेच आयोजित जंगी कुस्त्यांचा हगामा स्पर्धेत कार्यक्रमाला उपस्थितीत राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्ट,ग्रामपंचायत हिवरगाव पावसा व ग्रामस्तांच्या वतीने करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *