सिन्नर तालुक्यातील युवकांवर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी
सिन्नर तालुक्यातील युवकांवर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विस्तार नासिक आणि दिंडोरी येथे महाराष्ट्र अभिमान युवक मेळावा जागोजागी घेवून पर पडला. यावेळी सिन्नर तालुका शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस युवक पद नियुक्ती करण्यात आली . राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांचे प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब भाई शेख , युवक प्रदेश उपाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग , जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, गजानन नाना शेलार, गोकुळ शेठ पिंगळे, युवक जिल्हाध्यक्ष शाम हिरे ,युवक कार्याध्यक्ष गणेश गायधनी, युवक सरचिटणीस दिनेश धात्रक अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तोफिक भाई मणियार यांच्या प्रमुख उपस्थितीत सिन्नर तालुका युवकांना आगामी निवडणुकांत मोठ्या संख्येने निवडून येण्यासाठी पद नियुक्ती देण्यात आली. सिन्नर तालुका युवक अध्यक्ष संदीप शेळके यांच्या उपस्थितीत गणीभाई सय्यद अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष युवक , संतोष सरोदे उपाध्यक्ष युवक सिन्नर , तुकाराम भाबड सरचिटणीस सिन्नर तालुका, संतोष कांदळकर संघटक तालुका , मंगेश शेळके नांदूर शिंगोटे गटप्रमुख , सोपान भाबड गटप्रमुख चास, गौरव साबळे सिन्नर तालुका सोशल मीडिया प्रमुख यांची या मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. शरदचंद्रजी पवार यांच्या विचारधारेशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना पत्र नियुक्ती देण्यात आली. येणाऱ्या काळात हे पदाधिकारी मोठ्या ताकदींने पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतील आणि शेतकऱ्यांच्या युवकांचे प्रश्न मांडतील.