क्राईम

सार्वजनिक बांधकाम शाखा अभियंत्याची लाचखोरी सिद्ध; लाच सहा हजाराची, शिक्षा तीन वर्ष कारावास, पाच हजाराचा दंड 


सार्वजनिक बांधकाम शाखा अभियंत्याची लाचखोरी सिद्ध;

लाच सहा हजाराची, शिक्षा तीन वर्ष कारावास, पाच हजाराचा दंड 

लातूर प्रतिनिधी

लातूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेतील शाखा अभियंता दत्तात्रय राजाराम पडवळ यांना सहा हजार रुपये लाच घेतल्याच्या प्रकरणात लातूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. व्ही. व्ही. पाटील यांनी दोषी ठरवून तीन वर्षांचा कारावास आणि 5 हजार रुपये दंड अशी सजा ठोठावली आहे.सन २०१६ मध्ये लातूरच्या शिवाजी नगर पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल होता.

नमुद गुन्हयात मुळ तक्रारदार यांनी सार्वजनीक बांधकाम विद्युत विभागा मार्फत पशु संवर्धन विभागात चार ए-सी- बसविले होते. त्याचे बिल दिनांक 16/01/2016 रोजी मिळाले होते- तक्रारदार यांनी सदर बिलाचे कमिशन दिले नव्हते तसेच दिनांक 18/11/2015 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील वातानुकुल यंत्राचे कॉम्प्रेसर बदलण्याचे काम मिळाले होते- केलेल्या कामाची एम.बी.बिल मंजुरीसाठी देण्यात आले होते. परंतु पहिल्या बिलाचे कमिशन 10,000/- रूपये न दिल्यामुळे दुसरे बिल काढण्याचे कामासाठी पहिल्या कामाचे 10,000/- रूपयांची मागणी करून तडजोडी अंती 6,000/- रूपये घेण्याचे मान्य करून सदर लाचेची रक्कम स्विकारली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयाचे साक्षी पुरावा ग्राहय धरून न्यायालयाने नमुद आरोपी लोकसेवकास दोषी ठरविले आहे.

Advertisement

या प्रकरणात तपासी अधिकारी तत्कालीन पो. निरीक्षक सध्या सेवा निवृत्त असलेले ए.आर.मोरे, यांनी तपास अधिकारी म्हणून काम पाहिले.पर्यवेक्षण अधिकारी म्हणून लातूर लाच प्रतिबंधक विभागाचे पो. उपाधीक्षक संतोष ध. बर्गे,कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पो. नि. अन्वर मुजावर, ला. प्र. वि. लातूर,

पो. ह. भागवत एन. कठारे, ला. प्र. वि. लातूर, पो.अ. योगेश एस. चिंचोलीकर, ला. प्र. वि. यांनी काम पाहिले

शासकीय अधिकारी कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणी संदर्भात संदीप पालवे, पोलीस अधीक्षक – 9545531234

, संतोष ध. बर्गे पोलीस उप अधीक्षक-07744812535, टोल फ्री – 1064, हेल्पलाईन क्रमांक कार्यालयाचा फोन क्रमांक – 02382 – 242674 येथे संपर्क साधावा असे आवाहन लातूर ए सी बी ने केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *