क्राईम

शेती मातीच्या संघर्षाचे प्रतिबिंब साहित्यातुन उमटायला हवे ; १३ वे ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विजयकुमार मिठे यांचे आवाहन; साहित्य, भाषा व संस्कृती संशोधन केंद्रासाठी आमदार खोसकर यांनी केला एक कोटीचा निधी जाहिर! कावनई मध्ये केंद्र उभारणीसाठी जागा देण्याची सरपंच गोपाळ पाटिल यांची घोषणा


शेती मातीच्या संघर्षाचे प्रतिबिंब साहित्यातुन उमटायला हवे ;

१३ वे ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विजयकुमार मिठे यांचे आवाहन

साहित्य, भाषा व संस्कृती संशोधन केंद्रासाठी आमदार खोसकर यांनी केला एक कोटीचा निधी जाहिर!

कावनई मध्ये केंद्र उभारणीसाठी जागा देण्याची सरपंच गोपाळ पाटिल यांची घोषणा


—-मराठी संस्कृती जतन करा, १ जानेवारी नव्हे तर चैत्र पाडवा हा आपल्या नव वर्षाचा पहिला दिवस आहे.———————–

ईगतपुरी प्रतिनिधी

——–

साहित्य हे वास्तवाशी निगडीत असावे.सामान्य माणसाला केंद्रबिंदु ठेवुन त्याच्या जगण्याचा संघर्ष साहित्यात यायला हवा. सत्तेचे गुलाम नको, भांडवलदाराच्यां हातचे बाहुल नको, तर प्रस्थापितानां देशोधडीला लावणार्या व्यवस्थेविरुद्ध संघर्ष हवा. हे खरे साहित्य.शेती मातीचा लढा साहित्यातुन प्रतिबिंबित होऊन व्यवस्थेला हादरा देणारं साहित्य हवं असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा यांचे वतीने मोडाळे ता.ईगतपुरी येथे आयोजीत १३ वे नवोदिताचें व ग्रामिण साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष, सुप्रसिध्द साहित्यिक विजयकुमार मिठे यांनी केले.

व्यासपिठावर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद राष्ट्रिय अध्यक्ष शरद गोरे, आमदार हिरामण खोसकर, स्वागताध्यक्ष गोरख बोडके, जेष्ठ साहित्यिक तथा परिषदेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष देविदास खडताळे, परियदेचे संघटक अमोल कुंभार, उद्योगपती तानाजी गायकवाड, अभिनेते तथा साहित्यिक अजय बिरारी,लेखक प्रशांत कोतकर जळगाव, दिलीप कजगावकर, माणिकराव गोडसे, पुंजाजी मालुंजकर, न्या.सलंत पाटिल, परिषदेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष, आयोजक नवनाथ अर्जुन पा. गायकर, मोडाळे सरपंच शिल्पाताई आहेर, डॉ. महेंद्र शिरसाट आदिसह मान्यवर उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी आपल्या भाषणात बहुजनाचां आवाज व साहित्य आणि संस्कृती दाबण्याचा प्रस्थापितांनी प्रयत्न केला.साहित्य संमेलने ही बहुजनाचीं वैचारिक व्यासपिठे आहेत.आणि समाजानेच ती ताकदीने टिकवली पाहिजे,असे प्रतिपादन केले.

Advertisement

आमदार हिरामण खोसकर यांनी परिदेला भाषा, साहित्य व संस्कृती संशोधनासाठी एक कोटी रुपयाचा निधी देण्याची घोषणा यावेळी केली.तर कानऩई गावचे सरपंच गोपाळ पाटिल, डॉ. महेंद्र शिरसाट आदिसह ग्रामस्थानीं संशोधन केंद्रासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली.

प्रास्ताविक करतानां आयोजक नवनाथ गायकर यांनी गेली तेरा वर्ष ही चळवळ राबवतानां आलेल्या अडथळयावर मात करत एक तप पुर्ण केल्याचे सांगितले.परिषद पुढिल काळातही नव्या दमाने काम करत राहिल अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी आदर्श जनसेवक पुरस्काराने गोरख बोडके यांना सन्मानित केले गेले. आदर्श आरोग्यदाता म्हणुन सहयाद्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेंद्र शिरसाट, आदर्श आरोग्य दुत डॉ. जयवंत जगताप, आदर्श आरोग्यसेवक रमेश आवारी, आदर्श गाव मोडाळे, आदर्श ग्रामसेवक हनुमंता दराडे , आदर्श युवा नेते तुकाराम वारघडे, आदर्श विदयालय मोडाळे, जीवनगौरव बाळासाहेब पलटने, कवियत्री सुशिला संकलेचा, स्व. स्वामी गायकर काव्य गौरव कवी नंदकिशोर ठोंबरे, वै.ह.भ.प. किसन म. काजळे किर्तन केसरी पुरस्कार ह.भ.प.नामदेव म. डोळस , काव्यभुषण पुरस्कार तानाजी धारणे हेलपाटाकार, रायगड, आदर्श सरपंच गणेश टोचे निनावी, शिवाजी पा. गाढवे, धामणगाव आदि मान्यवरानां प्रदान करण्यात आला.

साहित्य संमेलनाचा प्रारंभ भजनी मंडळ मोडाळे व माध्यमीक विदयालयाचे लेझीम पथक व नृत्य पथकाने झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ गायकर यांनी केले तर सुत्रसंचालन बाळासाहेब गिरी यांनी केले.

यावेळी नवनाथ गायकर यांना उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष म्हणुन राष्ट्रिय अध्यक्ष शरद गोरे यांनी निवड केली तर बाळासाहेब गिरी यांची नाशिक जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली. सदर निवडीचे पत्र शरद गोरे यांचे हस्तधामणगाी देण्यात आले. आभार कवी रमेश मुकणे यांनी मानले.

यावेळी सर्वश्री प्रकाश धारणे, तानाजी धारणे, प्रतिक मिठे, नीता बागुल, सुनिता वाळुंज, मानसी बर्वे, रंजना व्होरा, उज्वला सुतार, देविदास शिरसाट, गणेश शिरसाच, संतोष शिरसाट, प्रतिक गोवर्धने, निलेश गोवर्धने, करण गोवर्धने, पत्रकार शरद मालुंजकर, विकास शेंडगे आदिसह अनेक मान्यवर हजर होते.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्वश्री नवनाथ गायकर, सरपंच शिल्पाताई आहेर, मुख्याध्यापक मोरे सर, कचरु पा. धात्रक, वसंत बाबा धात्रक, अशोक आहेर, दिलीप मेदडे, लैभव गायकर, संदिप मुसळे,गोरख पालवे,रमेश मुकणे, रविद्रं पाटिल, प्रांजल कोकणे, विदया पाटिल, ग्रामसेवक दराडे, संपत जगताप आदिसह पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *