एकनाथ शिंदे साहेब! आनंद दिघेंना तुम्ही तुमच्या हृदयात असुनही वाचवु शकला नाहीत , निदान जरांगे पाटलांचा तरी जिव वाचवा! मराठा समाजाची आर्त हाक असणारे कुबेर जाधव यांचे पत्र
एकनाथ शिंदे साहेब!
आनंद दिघेंना तुम्ही तुमच्या हृदयात असुनही वाचवु शकला नाहीत , निदान जरांगे पाटलांचा तरी जिव वाचवा!
Advertisement
मराठा समाजाची आर्त हाक असणारे कुबेर जाधव यांचे पत्र
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब,
सस्नेह नमस्कार!
संपुर्ण महाराष्ट्रातील तमाम जनता,आपल्या कडे एक संवेदनशील नेता म्हणून पाहतो,आपण दिलेला शब्द पाळतात, अशी आपली संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे, आपण नवी मुंबई वासी मध्ये लाखो मराठा बांधवांन समोर मुख्यमंत्री म्हणून शपथ पुर्वक सांगितले की मी दिलेला शब्द पाळनारा मुख्यमंत्री आहे,तो शब्द खरा करून दाखवायची वेळ नजिक येवुन ठेपली आहे, तुम्ही त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला साक्षी ठेवून सांगितले होते की येत्या १५/१६ तारखेला महाराष्ट्र विधानमंडळाचे विशेष अधिवेशन फक्त आणि फक्त मराठा आरक्षणासाठी बोलवण्यात येइल, परंतु अद्यापही अधिवेशनाची तारीख निश्चित नाही, राज्य सभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अधिवेशनाची तारीख पुढे ढकलण्याचा घाट घातला जात आहे, आता २० तारखेला अधिवेशन बोलवलं जाते आहे, अशी चर्चा आहे, मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू करुन पाच दिवस उलटले आहेत,त्यांची तब्येत अतिशय चिंताजनक परिस्थितीत आहे, त्यांच्या नाकातून रक्तश्राव सुरू झाला आहे, जिल्हा शल्य चिकित्सकांनी जरांगे पाटलांच्या धोकादायक तबीयती विषयी निर्वाणीचा इशारा दिला आहे, त्यांना उपोषण सोडुन तातडीने इलाज करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे, माझी महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांना कळकळीची विनंती आहे की मराठा आरक्षण संदर्भातील श्री मनोज जरांगे-पाटील यांनी जिवघेंन उपोषण,सकल मराठा समाजाच्या उज्वल भविष्यासाठी मागे घ्यावे, कारण तुम्ही आम्हाला हवे आहेत,
शिंदे साहेब,
आपण भर सभेत स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली तेव्हा आपल्यातला जातिवंत मराठा महाराष्ट्राने पाहिला.
मराठा समाज श्री मनोज जरांगे-पाटील आपल्या लवाजम्यासह मुंबई मोहिमेवर आले तेव्हा आवश्यक तो शासननिर्णय काढुत चुणूक दाखवली,..
*१६ तारखेला सगेसोयरेचा अध्यादेश शासननिर्णयामध्ये परिवर्तीत करण्याचा आपण शब्द दिला आहे खरा* , परंतु त्यादृष्टीने सकारात्मक पावले पडताना दिसत नाहीत, २० तारखे पर्यंत पुढे ढकल्याचे कळले,मराठा तरुणांनावरील खोटे गुन्हे मागे घेण्याचे जे आश्वासन आपण दिले त्यावर कृती होताना दिसत नाही, नजिकच्या काळात लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता ती टांगती तलवार समोर आहे !
राज्यसभेसाठी निवडणूक रणधुमाळी सुरू आहे, त्यामुळे मराठा योद्धा जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाकडे दुर्लक्ष होत आहे, ही बाब अतिशय गंभीर आहे, महाराष्ट्र शासनाने याची तातडीने पावले उचलली पाहिजेत, जबाबदार मंत्र्यांना उपोषण स्थळी पाठवण्याच्यी व्यवस्था करण्यात यावी,मा जंरागे पाटलांच्या तबीयतीची योग्य ती काळजी घेऊनच , त्यांना उपोषण मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आग्रह धरावा अशी विनंती मराठा समाज बांधवांची केली आहे मराठा आरक्षणाचा यज्ञ वाया जाऊ नये म्हणून परत श्री मनोजदादा जरांगे-पाटील हे उपोषणाला बसले आहेत ,आज पाचव्या दिवशी त्यांची तब्येत अतिशय नाजूक झाली आहे ! शिंदे जी तुम्ही आणि तुमचे सरकार मनोजदादाला विश्वास द्यायला कमी पडत आहात !
*श्री मनोज जरांगे-पाटील यांनी नेहमी तुमच्या वर १००% विश्वास दाखवला आहे तो टिकवण्याची जबाबदारी तुमची आहे* ! श्री मनोजदादा जरांगे-पाटील हे संपुर्ण मराठा समाजाचे दैवत आहेत आणि सकल मराठा समाज आपल्या कडे मोठ्या आशेने पाहतोय !
*आपण आनंद दिघे साहेबांना गुरु मानता, तुमच्या हृदयात असुनही तुम्ही त्यांना वाचवु शकला नव्हता, पण निदान संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे-पाटील यांचा जीव वाचवून आपण ती खंत थोड्याफार प्रमाणात भरुन काढू शकता.
*श्री मनोज जरांगे पाटलांना तरी वाचवा!, त्यांचे उपोषण सुटावे म्हणुन लवकर शासननिर्णय पारित करा. असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांना करण्यात आले आहे*
-कुबेर जाधव
समन्वयक
स्वाभिमानी शेतकरी संघटना