क्राईम

मोदी त्र्यंबकेश्वराच्या दरबारात ! पंतप्रधानी त्र्यंबकेश्वरला भेट द्यावी अमित देवकुटींचे निमंत्रण 


 मोदी त्र्यंबकेश्वराच्या दरबारात !

पंतप्रधानी त्र्यंबकेश्वरला भेट द्यावी अमित देवकुटींचे निमंत्रण 

   ——–मराठी संस्कृती जतन करा, 1 जानेवारी नव्हे तर चैत्र पाडवा हा आपला नव्या वर्षाचा पहिला दिवस आहे.————————–

त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांनी आज येथे भेट देत त्रंबकेश्वराचे दर्शन घेतले. येथील युवा पुरोहित अमित जयप्रकाश देवकुटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रंबकेश्वरला भेट द्यावी यासाठी पंकज मोदींना पंतप्रधानांना निरोप देण्याची विनंती केली.

नाशिकच्या प्रसिद्ध कैलास मठाचे स्वामी सवितानंद सरस्वती महाराज हे पंकज मोदी यांचे समावेत होते.

ज्योतिर्लिंग त्रंबकेश्वर मंदिर गर्भग्रहात जाऊन पंकज मोदी व स्वामीजींनी अभिषेक केला.

Advertisement

पूजा पौरोहित्य अमित जयप्रकाश देवकुटे यांनी केले.

तसेच त्र्यंबकेश्वर मध्ये 2026 मध्ये हे सिंहस्थ कुंभमेळा असल्याने पुन्हा त्र्यंबकेश्वरला येण्याचे पंकज मोदी यांना निमंत्रण देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्र्यंबकेश्वरला भेट देण्याची विनंती करावी असे सुचवले. मंदिर ट्रस्टच्या वतीने देखील स्वागत करण्यात आले.

यावेळी महंत सत्यप्रकाश ब्रह्मचारी श्रीदेव त्रिपाठी शिवाजी डोळे अरविंदजी हे उपस्थित होते. भाविकांना देखील मोदीच्या बंधूंचे दर्शन घडले. यापूर्वी मोदींचे बंधू सोमाभाई मोदी यांनी काही वर्षांपूर्वी त्र्यंबकेश्वर दर्शन घेतलेले आहे.

त्यामुळे भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी त्रंबकेश्वरला भेट देतीलच असा विश्वास नववर्षाच्या प्रथम दिनी इथे व्यक्त होत आहे पंतप्रधानांचे बंधू असून देखील अतिशय साधेपणाने ते येथे दर्शनाला आले हे विशेष होय.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *