शिर तोडून खूनी थेट पोलिस ठाण्यात ; ननाशीचा थरार, नागरिकांचा संताप आणि पोलिसांची धावपळ
शिर तोडून खूनी थेट पोलिस ठाण्यात ;
ननाशीचा थरार, नागरिकांचा संताप आणि पोलिसांची धावपळ
मराठी संस्कृती जतन करा
नाशिक प्रतिनिधी
पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ननाशी औट पोस्ट ता. दिंडोरी येथे गावच्या भरवस्तीत सकाळी १० वाजेच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून एकाची धारदार कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी मयताचे शीर घेऊन कुऱ्हाडीसह पोलीस ठाण्यात पोहोचला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ननाशी औट पोस्ट प्राथमिक आरोग्य केंद्रा नजीक ननाशी गावातील गुलाब रामचंद्र वाघमारे, सुरेश बोके व विशाल बोके यांच्यात काही कारणावरून गेल्या दोन वर्षापासून वाद सुरु होता. या वादाच्या कारणावरून वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली होती. मात्र, आज नववर्षाच्या सकाळीच गुलाब वाघमारे, सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यांत वाद उफाळून येऊन त्याचे रुपांतर हाणामारीत झाली. यात सुरेश बोके,विशाल बोके यांनी थेट गुलाब वाघमारे यांचे मुंडके कुऱ्हाडीने धडावेगळे केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर बोके बंधूंनी सिनेस्टाईल पद्धतीने मयत वाघमारेचे मुंडके व हत्यार घेऊन ननाशी पोलीस ठाण्यात दाखल होत झालेल्या घटनेचा खुलासा केला. या खुनाच्या घटनेमुळे ननाशीत तणावाची स्थिती निर्माण झाली असून गावात पोलीसांची कुमक दाखल झाली आहे.