कै. संतोष देशमुख यांचा खुन खंडणी प्रकरणातुन की विधानसभा निवडणुक फंडातून ?
कै. संतोष देशमुख यांचा खुन खंडणी प्रकरणातुन की विधानसभा निवडणुक फंडातून ?
मराठी संस्कृती जतन करा
विधानसभा उमेदवार धनंजय मुंढे यांची विधानसभेची जबाबदारी वाल्मिक कराड याच्यावर होती.आणि विधानसभा निवडणुक काळात पवन उर्जा कंपनी कडे दोन कोटी रूपयेची मागणी वाल्मिक कराड करतो.पवन उर्जा कंपनीकडुन काही रक्कम वाल्मिक कराडला देण्यात येते,पवन उर्जा कंपनीला उर्वरित रक्कम मागण्या करीता वाल्मिक कराडची माणसे गेली असता गेटवरच्या सुरक्षा रक्षकांनी कंपनीत जाण्यास मज्जाव केला,म्हणुन वाॅचमेन व कंपनीच्या अधिकाऱ्याला वाल्मिक कराडची माणसे मारहाण करतात,पवन उर्जा कंपनीचा सुरक्षा कर्मचारी हा मस्साजोग गावातील असल्याने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख जाब विचारण्यास गेले असता, सरपंच संतोष देशमुख व वाल्मिक कराड यांच्या माणसां ( गुंड) मध्ये वाद आणि हाणामारी होते.दुसऱ्या दिवशी वाल्मिक कराडची माणसे ( गुंड) कै.सरपंच संतोष देशमुख यांना किडनॅप करून त्यांची निर्घृण हत्या करतात, निर्घृण हत्या झाल्याने हे प्रकरण वा-या सारखे सोशल मिडीयावरून राज्यभर पसरते, या घटनेचा निषेध आणि तिव्र संताप व्यक्त होऊ लागतो. मनोज जरांगे-पाटील हे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटूंबाची भेट घेऊन खुनी मारेकऱ्याना अटक करून फाशीच्या शिक्षेची मागणी करत मोठ्या संख्येने जमलेल्या संतप्त जमावासह ठिय्या आंदोलन करतात. पोलीसांकडून आश्वासन घेऊन आंदोलन मागे घेतले जाते. हे प्रकरण राजकीयद्रुष्टया अती संवेदनशील होत असल्याचे दिसताच,तसेच संपूर्ण राज्यात तिव्र
् संतापाची लाट उसळताच,विधिमंडळात लोकप्रतिनिधी कडून चर्चा आरोप,प्रक्ष्नांचा बडीमार होताच उर्जा कंपनी कडुन वाल्मिक कराड व त्याच्या माणसांवर ( गुंडांवर) दोन कोटी रूपये खंडणी मागितल्या प्रकरणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होतो, वाल्मिक कराड च्या माणसांवर ( गुंडांवर) खंडणी आणि खुनाच्या आरोपाखील गुन्हा दाखल पण वाल्मिक कराड वर फक्त खंडणीचाच गुन्हा कसा काय दाखल होतो?.
पुन्हा या प्रकरणातील घटना क्रम समजून घेता,
१) आताचे हेवी वेट मंत्री धनंजय मुंढे यांची २०२४ ची विधानसभा निवडणुकीची सर्व जबाबदारी असलेल्या वाल्मिक कराडने विधानसभा निवडणुक काळात पवण उर्जा कंपनीकडे दोन कोटी रूपयांची मागणी करणे ?
२) उर्जा कंपनीने दोन कोटी रुपये खंडणीची रक्कम वेळेत पुर्ण न दिल्याने वाल्मिक कराडची माणसे उर्जा कंपनीत उर्वरित रक्कम मागणी करण्यासाठी गेले असता उर्जा कंपनीच्या गेट वरील सुरक्षा रक्षकांनी अटकाव केल्याने त्यास वाल्मिक कराडच्या माणसांकडून मारहाण होते , मारहाण झालेला वाॅचमेन मस्साजोग गावचा रहिवाशी असल्याने सरपंच या नात्याने संतोष देशमुख हे वाल्मिक कराड च्या माणसांना ( गुंडाना) जाब विचारण्यास गेले असता त्यांच्यात किरकोळ मारामारी होते, हा राग मनात ठेऊन वाल्मिक कराड ची माणसे ( गुंड ) कै, सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून क्रूरपणे,निर्घृण हत्या करतात.अंस असताना
आता समजून घ्या,
वाल्मिक कराडवर कै. संतोष देशमुख यांच्या खुनाच्या आरोपाखी गुन्हा का आजपर्यंत दाखल झाला नाही ? वाल्मिक कराड गेली २२ दिवस पुण्याच्या आसपास असुनही त्यास अटक का केली गेली नाही ?. आणि महत्वाचा मुद्दा बीडचे आमदार मंत्री भाऊ- बहीण हे कै. संतोष देशमुख यांच्या कुटूंबास का भेट देउ शकत नाहीत ? आणि या अती संवेदनशील प्रकरणावर प्रसार माध्यमांशी काल परवा पर्यंत का बोलत नव्हते ते ? त्यांचं सोईस्कर मौन काय दर्शवत ? यातुन महाराष्ट्रातील
भयभीत जनतेने काय बोध घ्यायचा?
विधानसभा लोकसभा निवडणुक काळात बडे उमेदवार मतदारसंघातील व्यवसायिकांकडुन निवडणुक फंड गोळा करतात.
महाराष्ट्र राज्यात लोकशाही सुव्यवस्था अबाधित असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस , महाराष्ट्र पोलीस,सी आय डी ,हे कै. संतोष देशमुख खुन प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करून जे जे दोषी असतील त्या पैकी कोणासही न सोडता सर्व दोषी विरोधात भक्कम पुराव्यानिशी रेकॉर्ड तयार करून न्यायालयाकडे सुपूर्द करून या सर्व आरोपीना फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रामाणिक पणाने कर्तव्य पार पाडुन फास्ट ट्रॅक कोर्टात केस दाखल करून फासावर लटकुन पिडीत कुटुंबातील सदस्यांना न्याय मिळवून देतील का? हा संतप्त सवाल महाराष्ट्रातील आम जनतेला पडला आहे.
– कुबेर जाधव
नाशिक
ताक. संदर्भ:- मराठी न्युज चॅनेल वरील बातम्या आणि न्युज चॅनेल वर विविध प्रतिनिधींनी दिलेली स्टेटमेंटवर आधारित