क्राईम

मराठा समाजाच्या एकीवर प्रहार: जातीपेक्षा पक्ष आणि नेता महत्त्वाचा वाटणाऱ्यांचे षडयंत्र उघड विधानसभेत मराठा समाज एकी दाखवणार – करण गायकर, संस्थापक अध्यक्ष छावा क्रांतिवीर सेना


मराठा समाजाच्या एकीवर प्रहार: जातीपेक्षा पक्ष आणि नेता महत्त्वाचा वाटणाऱ्यांचे षडयंत्र उघड

 

विधानसभेत मराठा समाज एकी दाखवणार – करण गायकर, संस्थापक अध्यक्ष छावा क्रांतिवीर सेना

 

 

नाशिक प्रतिनिधी

निवडणुका जाहीर झाल्यापासून काही स्वार्थी मराठ्यांना जातीपेक्षा पक्ष आणि नेता महत्त्वाचा वाटू लागला आहे.या प्रवृत्तीचे लोक गावच्या चावडीवर आणि सोशल मीडियावर आपली अस्वस्थता व्यक्त करीत आहेत.भाजपच्या IT सेलद्वारे मराठा समाजातील एकता भंग करण्यासाठी असे मेसेज तयार करून पसरवले जात आहेत.याचा उद्देश समाजात फूट पाडण्याचा आहे.असा आक्षेप छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी नोंदवला आहे.

 

पक्षपाती विचारसरणीचे प्रश्न

 

भाजप सह महायुतीतील पक्ष्यांच्या काही गोष्टी सहज स्वीकारल्या जातात,त्याबद्दल कोणीही प्रश्न विचारत नाही:

 

देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख नेते मुस्लिमांच्या इफ्तार पार्टीत जातात, ते मान्य.

 

युती सरकारमध्ये मुस्लिम मंत्री अब्दुल सत्तार आणि हसन मुश्रीफ हे तुमच्या सगळ्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून बसतात,ते चालते.

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांनी मौलाना आझाद महामंडळाला ५०० कोटींची तरतूद केली आणि मदरशातील शिक्षकांच्या पगारात वाढ केली,ते मान्य.

Advertisement

 

 

पण मराठ्यांनी मुस्लिमांसोबत काम केले तर त्यावर टीका का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही अनेक मुस्लिम मावळे त्यांच्या सोबत होते,आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी मुस्लिम समाजानेही मराठ्यांना साथ दिली आहे.

 

जरांगे पाटील आणि मराठा एकता

 

मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्यामुळे असंख्य मराठे एकत्र आले आहेत.पण भाजपचे काही लोक पक्षाच्या हितासाठी या एकतेला धक्का देण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपने जाणीवपूर्वक मराठा लढवय्या मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट केले आहे,ज्यामुळे मराठा समाज भाजपपासून दूर जात आहे.

 

मराठा समाजाची ताकद दाखवणार

 

छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या मुलाला राज्यपाल नियुक्त आमदारकी देणे हे मराठा समाजाच्या लढ्याला थेट आव्हान आहे. मराठा समाज याचा बदला येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच घेणार आहे.छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागणार आहे, तसेच त्यांच्या मुलाला आमदारकी देणाऱ्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही,अशी मराठा समाजाची कटाक्षी योजना आहे.

 

एकजूट आणि लढ्याचे आवाहन

 

करण गायकर यांनी मराठा समाजाला आवाहन केले आहे की,या निवडणुकीत मराठ्यांनी एकजूट दाखवून आपले हक्क आणि स्वाभिमान राखण्यासाठी एकत्र येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या समाजाच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात,त्यासाठी मराठ्यांचे हक्काचे प्रतिनिधी सभागृहात पोहचणे आवश्यक आहे.ही लढाई आपल्या पिढीच्या भविष्यासाठी आहे,त्यामुळे स्वतःवर गद्दारीचा कलंक लावू नका,असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक तथा छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *