ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते उतमराव कांबळेना जीवनगौरव ; तर पत्रकारांना हेल्मेट व सायकल वाटप घसरलेला राजकीय स्तर आणि ना. महाजनांचे चिमटे मंगळसूत्र गहाण ठेवून कागद आणणारा संपादक आणि एका रात्रीत 103 चॅनल विकत घेणारा मालक मी बघितला:उत्तमराव कांबळे
ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते उतमराव कांबळेना जीवनगौरव ; तर पत्रकारांना हेल्मेट व सायकल वाटप
घसरलेला राजकीय स्तर आणि ना. महाजनांचे चिमटे
मंगळसूत्र गहाण ठेवून कागद आणणारा संपादक आणि एका रात्रीत 103 चॅनल विकत घेणारा मालक मी बघितला:उत्तमराव कांबळे
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
………………………………………………………………………………
सिडको प्रतिनिधी :
पत्रकारांनी जबाबदारीचे भान ठेवून काम करावे. पूर्वी पत्रकारांचा आगळाच दरारा होता. पूर्वी पत्रकारांना पुढारी घाबरत असत.परंतु आता हे चित्र दिसत नाही अशी खंत जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.
पत्रकारितेत संपूर्ण आयुष्य घालविलेल्या उत्तम कांबळे यांना लाख मोलाचा जीवनगौरव पुरस्कार दिल्याने या पुरस्काराची किंमत वाढली आहे, अशा शब्दात महाजन यांनी कांबळे यांच्या कार्याचा गौरव केला. आगामी कुंभमेळा माझा कुंभमेळा आहे असं समजून सर्वांनी काम करावे असा सल्ला देऊन ना.महाजन यांनी आपल्या छोटेखानी भाषणात विरोधकांना अनेक कोपरखळ्या मारून सभागृह सतत हसत ठेवले. काही लोक सकाळपासून काय काय बोलतात हे आपण सर्व बघत आहोत. असा टोला त्यांनी संजय राऊत यांचा नामोल्लेख न करता लगावला.यांच्या बद्दल न बोललेलेच बरे.समाजाला किंवा कुणालाही त्यांचे बोलणं आवडत नाही. अशी पुस्तीही त्यांनी पुढे जोडली. मी भाजपचा सीनियर आमदार आहे.मनोहर जोशी,विलासराव देशमुख,गोपीनाथ मुंडे यांच्या काळातील सभागृह बघितले आहे.त्यांचे भाषण ऐकावेसे वाटे.ते एकमेकांना चिमटे काढत.मात्र त्यांचं बोलणं मार्मिक असायचं.त्यांच्या बोलण्याचा स्तर उंच होता.परंतु आता आमदार डायरेक्ट हातघाईवर येत आहेत. कुणी कुणाची मानमर्यादा ठेवत नाही, असे महाजन म्हणाले.पत्रकारितेमुळे समाजावर वचक आहे.मीडियाला बघितल्यावर आम्हाला जपून बोलावे लागते,अशी कोपरखळी त्यांनी लगावली.
पत्रकाराने समाजाचा आरसा बनावे.त्याचा प्रारंभ, मध्य आणि अंतची बांधिलकी समाजाशी असावी.कारण तो व्हाईस ऑफ सोसायटी आहे, व्हॉइस ऑफ पॉलिटिक्स नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व मग जो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तमराव कांबळे यांनी सत्काराला उत्तर देतांना व्यक्त केले. पूर्वीची आणि आत्ताची पत्रकारिता याची तुलना करताना आजची पत्रकारिता निर्भीड राहिलेली नाही,असे खेदाने म्हणावेसे वाटते.असे सांगून जो सबळ आहे,तो टिकून राहील. पत्रकाराच्या कर्तृत्वाचे कितीही पोवाडे गायले जात असले तरी निर्भीड पत्रकारिता करणे सोपे राहिले नाही हे त्यांनी अनेक उदाहरणांसह पटवून दिले .जो दुर्बल आहे,त्याचे काही खरे नाही. मंगळसूत्र गहाण ठेवून कागद आणणारा संपादक आणि एका रात्रीत 103 चॅनल विकत घेणारा मालक मी बघितला आहे, असेही ते पुढे म्हणाले.कोल्हापूरचा एक वृत्तपत्र विक्रेता ते सकाळचा संपादक हा संघर्षमय जीवनपट त्यांनी सादर केला तेव्हा सभागृहात सर्व उपस्थित स्तब्ध झाले होते. नवीन नाशिक पत्रकार संघाने दिलेल्या पुरस्काराने मला काम करण्याची अधिक नवीन ऊर्जा मिळणार आहे.बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने मला मिळालेला हा पाचवा पुरस्कार आहे, याची आठवणही कांबळे यांनी आपल्या मनोगतात करून दिली.
नवीन नाशिक पत्रकार संघाच्या वतीने रविवार द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स हॉल येथे पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार उत्तमराव कांबळे यांना ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
प्रमुख अतिथी ना. गिरीश महाजन, आ. सीमा हिरे, ऊबाठा जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष वंदना पाटील, वंचित महानगर प्रमुख अविनाश शिंदे, आयमाचे अध्यक्ष ललित बुब, सावळीराम तिदमे, अजित चव्हाण, मुकेश शहाणे, स्वप्निल नन्नावरे, सोनाली राजे पवार, सोनाली ठाकरे, छाया देवांग, मनीषा पवार, बाळासाहेब पाटील, जगन पाटील, संजय गांगुर्डे, विजय पवार, प्रियदर्शन टांकसाळे, कुमार कडलग , जयंत महाजन, विलास पाटील, हर्षदा फिरोदिया, ज्योती कवर, कैलास अहिरे, नरेंद्र जोशी अनिल भालेराव आदी उपस्थित होते.
या प्रसंगी पत्रकारांना सायकल व हेल्मेटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण मालुंजकर तर प्रास्ताविक निशान पाटील तर आभार ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र शेळके यांनी मानले.
फोटो ओळी
सिडको : ना गिरीश महाजन यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना उत्तमराव कांबळे समवेत आ. सीमा हिरे, सुधाकर बडगुजर, अविनाश शिंदे, सावळीराम तिदमे आदी
चौकट
पत्रकार भूषण पुरस्कार
चारुशीला कुलकर्णी (लोकसत्ता) प्रशांत कोतकर (दै. सकाळ), संजय शहाणे (दै. लोकमत), साई प्रसाद पाटील (दै.दिव्य मराठी), फारुख पठाण (दै. देशदूत), अश्विनी पांडे (दै. गावकरी), मुकुंद बाविस्कर (भ्रमर), कमलाकर तिवडे (दै. नवराष्ट्र ), मदन बोरसे (दै. नवभारत), दिनेश जाधव ( दै. लोकनामा), अजय भोसले (लक्ष महाराष्ट्र ), सुदर्शन सारडा (इंडिया दर्पण), विजकुमार इंगळे ( दै. सकाळ), दीपक भावसार (दै. महासागर), राजेंद्र भांड आदी
चौकट
- समाज भूषण पुरस्कार
स्मिता चौधरी, डॉ. एस. एस. सोनवणे, डॉ. चंचल साबळे, डॉ. सत्यजित महाजन, डॉ. नितीन फरगडे, बी.एस. पवार
अँड. राहुल कासलीवाल, ॲड. हिमिका शहा, ॲड. धिरज हिरे, वपोनी सुनील पवार, मनोहर कारंडे, छाया देवरे, भाग्यश्री ढोमसे, भागवत आरोटे, गोकुळ पाटील, बंडूशेठ दळवी, संदीप मांडवडे, सदानंद नवले, कविराज वाणी, पुरुषोत्तम आव्हाड, बाळासाहेब घुगे, तुषार सोळुके, सीमा सोळुके, अर्चना जाधव, निशांत जाधव,डॉ. तुषार शिंदे आदी