क्राईमताज्या घडामोडी

धक्कादायक लव्ह जिहाद प्रकरण उघड. ४ जणांवर गुन्हे दाखल.अपहरण,अत्याचार, धर्मांतर,बळजबरी नंतर विवाह.


धक्कादायक लव्ह जिहाद प्रकरण उघड. ४ जणांवर गुन्हे दाखल.अपहरण,अत्याचार, धर्मांतर,बळजबरी नंतर विवाह.

 

संगमनेर प्रतिनिधी :

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत हिंदू समाजाच्या १९ वर्षीय तरुणीला ती अल्पवयीन असतानाच काही जिहादी प्रवृत्तीच्या तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांनी तिचा वारंवार पाठलाग करतं तिच्याशी लगड निर्माण करण्याचा प्रयत्न केला.तर तिला प्रेमाचे आमिष दाखवून तिच्याशी सलगी केली.तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला फसवून एका ठिकाणी बोलावून घेतले.तिथे तिला गुंगीचे औषध देऊन तिचे अपहरण केले.तिला लग्नासाठी एका कारमधून विविध शहरातून नेले. हॉटेल लॉज येथे नेऊन अत्याचार करतं,अश्लील फोटो व्हायरल करण्यासह तिला व तिच्या कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी देण्यात आली.तर तिचे बळजबरी धर्मांतर करत विवाह केल्याची पिडीत मुलीने घारगाव पोलिसांना हकीकत सांगितल्याने.घारगाव पोलिसांनी ४ तरुणांन विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून यात एका तरुणास अटक देखील कऱण्यात आली आहे.

 

घारगाव परिसरातील हिंदू समाजातील १९ वर्षीय तरुणी ती लहान असतानाच मुस्लिम समाजातील जिहादी प्रवृत्तीचा आरोपी शादाब तांबोळी याने तिच्याशी सलगी करण्यासाठी आरोपी कुणाल शिरोळे,लव्ह जिहाद प्रकरणातील मोरख्यां व जिहादी प्रवृत्तीचा तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी युसुफ चौगुले यांचे मदतीने आरोपी शादाब तांबोळी याने सदर अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग केला.तिला प्रेमाचे आमिष दाखवून तिच्याशी सलगी केली.

Advertisement

 

हिंदू मुलगी सज्ञान होण्यापर्यंत तिच्या संपर्कात राहून संधीची वाट पाहिली.यादरम्यान तिला फसवून आरोपी शादाब तांबोळी,आरोपी युसुफ चौगुले यांनी तिला पुणे जिल्ह्यातील मंचर येथे रविवार दिनांक ७ जुलै रोजी बोलवून घेतले.तेथे आरोपी युसुफ चौगुले याची कार क्रमांक एम एच १७ एक्स ००९७ मध्ये बसवून तिला पाण्यातून गुंगीचे औषध देउन तिचे अपहरण केले. ती अर्धवट बेशुद्ध असताना शादाब तांबोळी सोबत लग्न लावण्यासाठी तिला आरोपी युसुफ चौगुले याचे गाडीतून मंचरहून चाकण येथे नेण्यात आले.तेथून तिला व आरोपी शादाब तांबोळी याला दुसऱ्या गाडीतून मुंबई येथे पाठविण्यात आले.मुंबईत आरोपी आयाज पठाण याने तिला वेळोवेळी धमकावून हॉटेल व लॉज मध्ये पाठवून दिले.

 

हॉटेल व लॉजमध्ये आरोपी शादाब तांबोळी याने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. यानंतर तुझे अश्लील फोटो व्हायरल करील.तुला व तुझ्या घरच्यांना संपवून टाकील.अशा प्रकारच्या धमक्या देत वेळोवेळी अत्याचार केला.तर तिच्याकडून बळजबरी लग्नाच्या व धर्मांतराच्या कागद पत्रावर सह्या घेतल्या आहेत.

 

या लव्ह जिहाद प्रकरणातील घटनेनुसार पिडीत तरुणीने घारगाव पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार शादाब तांबोळी,युसुफ चौगुले,आयाज पठाण,कुणाल शिरोळे सर्व राहणार घारगाव तालुका संगमनेर जिल्हा अहील्यानगर यांचेवर अपहरण,बळजबरी धर्मांतर,विवाह,अत्याचार,जिवे मारण्याच्या धमकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास अहमदनगर जिल्हा पोलिस प्रशासन करत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *