ताज्या घडामोडी

मालेगाव व सिन्नर शहरांमध्ये मोटर सायकल चोरी करणारे सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात;  चोरीच्या ०७ मोटर सायकल हस्तगत


मालेगाव व सिन्नर शहरांमध्ये मोटर सायकल चोरी करणारे सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात;

 

 चोरीच्या ०७ मोटर सायकल हस्तगत

 

सिन्नर प्रतिनिधी 

नाशिक ग्रामीण जिल्हयातील मोटर सायकल चोरीचे वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने यांनी उघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राजु सुर्वे यांचे पथकाने मालेगाव व सिन्नर शहरात मोटर सायकल चोरी करणा-या ०७ आरोपीतांना ताब्यात घेवुन कारवाई केली आहे.

 

दिनांक २६/०७/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे जिल्हयातील मोटर सायकल चोरीचे गुन्हांचा समांतर तपास करीत असतांना, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मालेगाव शहर व सिन्नर तालुक्यातील माळेगाव एम.आय.डी.सी. परिसरात काही संशयीत चोरीच्या मोटर सायकल विक्री करण्याचे उद्‌द्देशाने येणार असल्याचे खात्रीशीररित्या समजले,

 

त्यावरून पोलीस पथकाने मालेगाव शहरातील जाफरनगर व गुलाबपार्क परिसरातुन खालील संशयीतांना ताब्यात घेवून त्यांचे कब्जातुन चोरीच्या ४ मोटर सायकल हस्तगत केल्या आहे.

 

शहा मोहंमद जैद मो. अस्लम उर्फ जाहिद, मालेगाव

, तबरेज आलम बदरे उर्फ बद-या, रा. जाफरनगर, आकिब शेख शफिक उर्फ सुस्तीया, सुरत, मेहबुब अली जाहिद अली, वय ३७, रा. गुलाबपार्क, मालेगाव, या संशयितांच्या ताब्यातून ०२ हिरो पेंशन प्रो, ०२ हिरो सी.डी. डिलक्स अशा एकुण ०४ मोटर सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.. यातील आरोपीतांनी कबुली दिल्यावरून मालेगाव छावणी पोलीस ठाणे कहील गुरुबं १६०/२०२४ भादवि कलम ३७९ हा गुन्हा उघडकीस आलेला आहे. सदर आरोपीतांचे इतर साथीदारांचा पोलीस पथक शोध घेत आहेत.

Advertisement

 

तसेच सिन्नर शहरातील माळेगाव एम. आय.डी.सी. परिसरात देखील चोरीच्या मोटर सायकल विक्रीसाठी काही संशयीत येणार असल्याची बातमी मिळालेवरून स्थागुशाचे पथकाने आलील ०३ सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले.

निखील विनय वाल्हेकर, वय २०, ज्ञानेश्वर गणपत शेलुते उर्फ आऊष सोनार, क्य २८, रा. छावणी, तोफरखाना बाजार, जि. छ. संभाजानगर संदिप संजय वाल्हेकर, वय २२, रा. वेल्हाळे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर आरोपीचे कब्जातुन ०१ बजाज पल्सर, ०१ हिरो स्पलेंडर, ०१ टिव्हीएस अपाचे अशा ०३ चोरीच्या मोटर सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत . सदर आरोपींनी कबुली दिल्यावरून संगमनेर शहर, एम.आय.डी. सी. अहमदनगर व चंदननगर पुणे शहर पोलीस ठाण्यांकडील मोटर सायकल चोरीचे ०३ गुन्हे तसेच सिन्नर एम. आय. डी.सी. पो.स्टे. कडील गुरणं ३३७/२०२४ भान्यासं. ३०३(२) असे एकूण ०४ गुन्हे उघडकीस आलेले आहे. वरील तिघेही आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर यापुर्वी चोरी, जबरी चोरी, घरफोडी यासारखे मालाविरूध्धचे गंभीर गुन्हे दाखल आहे. सदर आरोपीचे इतर साथीदारांचा पोलीस कसोशिने शोध घेत असून त्यांचेकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजु सुर्वे, सपोनि गणेश शिंदे, पोहवा नवनाथ सानप, उदय पाठक, चेतन संवत्सरकर, पोना विनोद टिळे, शरद मोगल, विश्वनाथ कावड, सुभाष चोपडा, योगेश कोळी, दत्ता माळी, देवा गोविंद, नरेंद्र कोळी, तसेच तांत्रिक शाखेचे पोना हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, भाउसाहेब टिळे यांच्या पथकाने मोटर सायकल चोरीचे ०५ गुन्हे उघडकीस आणली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *