ताज्या घडामोडी

*इलेक्ट्रीक बसमध्ये आता बस सुंदरी* नितीन गडकरी यांची नवी घोषणा


*इलेक्ट्रीक बसमध्ये आता बस सुंदरी*

नितीन गडकरी यांची नवी घोषणा

 

नाशिक /किरण घायदार

 

आता ज्या नागरिकांना विमानांमधून प्रवास करणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी इ बस खूप फायदेशीर ठरणार आहे. या बस मध्ये पण तेवढेच सुविधा उपलब्ध आहेत . चहा -पाणी नाश्ता तसेच जसे एअर होस्टेस आहे, तसेच या बससाठी होस्टेस बस सुंदरी असणार आहे. विशेष म्हणजे या बससाठी डिझेलच्या बस पेक्षा तिकीट कमी असणार आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना बसमधून प्रवास करणे शक्य होईल.

नितीन गडकरी यांनी नवीन प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आहे.

इलेक्ट्रिकच्या बसेसमध्ये काही अडचण नाही , गडकरी यांनी माहिती देतांना सांगितले की,

मी आता नवीन प्रोजेक्ट करतोय. या नवीन प्रोजेक्टमध्ये टाटा कंपनीचे मी झेकोस्लेव्हिया येथे स्कोडा कंपनीसोबत जॉईंट व्हेंचर करून दिले आहे . या प्रोजेक्ट मध्ये देशात इलेक्ट्रिक बस चालू केल्या जाणार आहेत. या बस मध्ये विमान सेवेप्रमाणे बस सुंदरी असणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील एक कार्यक्रमांत दिली.

 

*इलेक्ट्रॉनिक्स बसमध्ये सुविधा…*

Advertisement

 इलेक्ट्रिक बस ही 18 ते 40 मीटरची आहे. ती बस ज्यावेळेस बस स्टॉपवर थांबेल, त्यावेळेस इलेक्ट्रिक बस अर्ध्या मिनिटांमध्ये 40 किमीची चार्जिंग करेल. त्यामुळे कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही तसेच या बसमध्ये एक्झिक्युटीव्ह क्लास पण आहे, लॅपटॉप पण या बस मध्ये असेल. विशेष म्हणजे या बससाठी होस्टेस हे , जसे एअर होस्टेस आहे तसेच हे पण बस सुंदरी असणार आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

या बसमध्ये चहा-पाणी, नाश्ता बस मधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मिळेल. विशेष म्हणजे, या बसचे तिकीट डिझेलच्या बस पेक्षा 30 टक्के कमी असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी ही बस खूप फायदेशीर ठरणार आहे. अशी माहितीही गडकरी यांनी दिली.

 

*बस सुंदरी बसची पहिली सुरुवात कोठे होणार*

 

या बसची पहिली सुरुवात नागपूर येथे होणार आहे. म्हणजे हा इलेक्ट्रिक बसचा पहिला प्रोजेक्ट नागपूरला सुरू होणार असून, त्यानंतर या इलेक्ट्रिक बसचा प्रोजेक्ट पुण्यामधील रिंग रोडवर हा प्रोजेक्ट सुरू करण्यात येईल.

एका भविष्यकाळामध्ये या इलेक्ट्रिक बसमुळे प्रदूषण मुक्त बनवण्यासाठी इथेनॉलचा वापर करणाऱ्या या वाहतुकीची सेवा सुरू करण्याबाबत नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केले.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *