अकोले तालुक्यातील बेलापूर येथे दोन भावजयांचा खून ; पोलीस घटनास्थळी दाखल माथेफिरू प्रसार…
अकोले तालुक्यातील बेलापूर येथे दोन भावजयांचा खून ; पोलीस घटनास्थळी दाखल माथेफिरू प्रसार…
अकोले प्रतिनिधी
जमिनीच्या आणि पैशाच्या वादातून चुलत दिराने बेलापूर येथे दोन भावजयांवर सपासप धारदार शस्त्राने वार करून खून केल्याच्या घटनने बेलापूर गावासह संपूर्ण अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत अकोल्याचे पोलीस निरीक्षक मोहन मानिकराव बोरसे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे आरोपी फरार झाला असून पुढील तपासाचा आदेश देण्यात आला .
अकोल्याचे पथक आरोपीच्या मार्गावर आहे पुढील तपास पोलीस सुहास गोरे किशोर तळपे करीत आहे. माथेफिरू दत्तात्रय प्रकाश फापाळे याने हे वार केलेले आहेत अशी माहिती आई फुलाबाई यांनी पोलिसांना दिली. या हत्येमध्ये उज्वला अशोक फापाळे बेलापूर वैशाली संदीप फापाळे बदगी या दोन महिलांचा मृत्यू झाला.