ताज्या घडामोडीराजकीय

लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचे घाटनदेवी येथे जोरदार स्वागत ; रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन


लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचे घाटनदेवी येथे जोरदार स्वागत ; रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन

बेलगाव कुऱ्हे ( प्रतिनिधी )

लोकसभेसाठी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहिर झाल्यावर मुंबईहुन नाशिकला येतांना नाशिक जिल्ह्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या इगतपुरी जवळील घाटनदेवी मंदिर येथे राजाभाऊ वाजे यांचे जोरदार जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी राजाभाऊ वाजे यांनी घाटनदेवी मातेचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. याप्रसंगी काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव ठाकरे गटाचे हजारो कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. घाटनदेवी मंदिरापासुन राजाभाऊ वाजे यांच्या समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून भव्य मिरवणुक काढण्यात आली. या रॅलीत पाचशे ते सहाशे गाड्या सहभागी झाल्या होत्या.

Advertisement

 

या रॅलीमुळे कसारा घाटापासुन ते नाशिक पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

 

यावेळी आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार वसंत गिते, निर्मला गावित, जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड, जिल्हा उपप्रमुख निवृत्ती जाधव, माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर, तालुका प्रमुख भगवान आडोळे, माजी जि. प. सदस्य जनार्दन माळी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव, युवा सेनेचे मोहन ब-हे, समाधान बोडके, रमेश धांडे, उमेश खातळे, अशोक सुरुडे, नंदलाल भागडे, विठ्ठल लंगडे, नंदलाल भागडे, भुषण जाधव, काशिनाथ कोरडे, सोमनाथ घारे यांच्यासह महिलाही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

 

फोटो – घाटनदेवी येथे राजाभाऊ वाजे यांचे स्वागत करतांना आमदार हिरामण खोसकर, सुधाकर बडगुजर, निवृत्ती जाधव आदी
छायाचित्र : लक्ष्मण सोनवणे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *