मोनिका राऊत : चांगला नागरिक बनण्याचा प्रयत्न करा
विधी संघर्षीत बालकांना गुन्हयापासून
परावृत्त करण्यासाठी एक पाऊल :-
मोनिका राऊत : चांगला नागरिक बनण्याचा प्रयत्न करा
नाशिक प्रतिनिधी
पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, नाशिक शहर यांचे संकल्पनेतुन विधी संघर्षीत बालकांना गुन्हे करणे पासुन प्ररावृत्त करुन त्यांना समाजाचे मुळ प्रवाहात आणण्यासाठी परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त मोनीका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड विभागाचे सहा. पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या उपस्थितीत क्षत्रिय आहेर शिंपी समाज मंडळ पेलीकन पार्क मागे, सिडको, नासिक येथे विधी संघर्षित बालकांचे समुपदेशन करण्यात आले. न्याय मंडळ सदस्य शोभा पवार, जिल्हा प्रोव्हिशन अधिकारी ज्योती पठारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही समुपदेशन कार्यशाळा २८/०३/२०२४ रोजी दुपारी १६:०० वा. ते १८:०० वा. दरम्यान पार पडली.
समुपदेशन कार्यशाळेत उपायुक्त मोनीका राऊत यांनी आपल्या प्रास्तविक भाषणात बाल गुन्हेगारांना गुन्हा करण्यापासून परावृत्त होवुन एक चांगला नागरीक बनावे व समाज विघातक कृत्यापासुन दुर राहुन समाज उपयोगी काम करावे असे आवाहन करीत यापुढे तुमचे हातून कोणताही गुन्हा घडू नये अशी अपेक्षा व्यक्त केली.बाल न्याय मंडळ सदस्य शोभा पवार यांनी विधी संघर्षीत बालकाचे न्यायहक्का बाबत माहिती देवून शिक्षणाचा आधार घेत विधी संपर्षीत बालकांनी आपले जिवन सुखकर करावे, या बाबत मार्गदर्शन केले. शासनाकडून विधी संघर्षीत बालका असलेल्या विविध योजनांची माहिती देवुन शासनाचे योजनांबाबत अवगत केले.
जिल्हा प्रोव्हिशन अधिकारी ज्योती पठारे यांनी आपले मार्गदर्शनपर भाषणात विधी संघर्षीत बालकांनी शासन करीत असलेल्या मदतीचा फायदा घेवुन आलेल्या संधीचे सोने करीत आपले जिवन योग्य रितीने पुढे नेत समाजाचा चांगला घटक कसे बनु शकतो या बाबत मार्गदर्शन केले. विधी संघर्षीत बालकांना गुन्हा करण्यापासुन परावृत्त करणे बाबत मोलाचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाची सांगता सहा. पोलीस आयुक्त अंबड विभाग, शेखर देशमुख यांनी करतांना आपले मार्गदर्शनात विधी संघर्षीत बालकांनी कोणत्याही भाई दादाच्या प्रभावाखाली न येत्ता आपण समाजाचे एक सुजान नागरिक आहोत यांचे भान ठेवुन वागावे. कोणत्याही गुन्हेगाराचा वाईट प्रभाव जास्त काळ राहत नाही. एक ना एक दिवस ते कायदयाचे कचाट्यात सापडून त्यांचा शेवट हा जेलमध्येच होतो. तेव्हा अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आदर्श न मानता आपली सदसद विवेकबुध्दी जागृत ठेवुन कायदयाचे पालन करावे व चांगला नागरीक बनुन आपले परिवाराचे व आपले स्वताचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्नशिल असावे असे सांगुन विधी संघर्षति बालकांना गुन्हा करण्यापासून परावृत्त करणे बाबत मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वीतेसाठी अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर, पो.हवा.रविद्रकुमार पानसरे, पो.कॉ योगेश शिरसाठ, गुन्हे शोध पथकाचे पो.उप.निरी. फुलपगारे, पो.ना.परदेशी, पो.कॉ. सचिन कांरजे, पो.कॉ. निकम, पो.कॉ. पाटील आदींनी परिश्रम घेवुन कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.