ताज्या घडामोडीशिक्षण

*महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ, कोल्हापूर विभाग तर्फे निवेदन सादर


*महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ, कोल्हापूर विभाग तर्फे कला शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथेंना सादर

कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने मंगळवार दिनांक.. 26 मार्च 2024 रोजी कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक  महेश चोथे यांना कला शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या बाबत महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले आहे.सदर निवेदन प्रत्यक्ष भेटीअंती महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे धडपडणारे  तडफदार प्रदेश कोषाध्यक्ष सुहास पाटील, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष धनाजी कराडे, कोल्हापूर विभागीय उपाध्यक्ष सागर दिक्षित, कोल्हापूर विभागीय सचिव मोहन जाधव यांनी दिले.

यावेळी सकारात्मक चर्चा देखील करण्यात आली. महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे अभ्यासु नेतृत्व प्रदेश अध्यक्ष प्रल्हाद साळुंके, विविध रंगभूषेतून आंदोलन करणारे लढवय्ये प्रदेश सरचिटणीस  प्रल्हाद शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश कार्यकारिणी, कोल्हापूर विभागीय कार्यकारणी, सांगली जिल्हा कार्यकारिणी कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांना राज्यातील कला शिक्षकांचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रदेश कोषाध्यक्ष सुहास पाटील, कोल्हापूर विभागीय उपाध्यक्ष सागर दिक्षित व इतर पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले. अधिकाऱ्यांशी चर्चा करुन कला शिक्षक पदभरती 200 विद्यार्थी संख्या ग्रुहीत धरूनच राज्यातील शासनमान्य खाजगी प्राथमिक, माध्यमिक, व शासकीय आश्रम शाळा खाजगी आश्रम शाळा येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत एक कला शिक्षकाची आवश्यकता पटवून देण्यात आली. प्रत्येक शाळेत एक कलाशिक्षक भरण्यात यावा,या व इतर मागण्यांसाठी निवेदन दिले गेले.

Advertisement

 

 

आज महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या कोल्हापूर विभागीय संपूर्ण टीमचे प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन.. महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ सतत कला शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी खरी लढणारी संघटना आहे.एक कुटुंब आहे.तरी भविष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक कला शिक्षक एकत्र येऊन आपले अस्तित्व व कला विषय संपवण्यामागे कटकारस्थान रचणारे यांना चाप दिला पाहिजे.असा निर्धार करून  महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाची ताकद वाढविण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद साळुंके, प्रदेश सरचिटणीस
प्रल्हाद शिंदे,कोषाध्यक्ष सुहास पाटील, प्रदेश उपाध्यक्ष रामचंद्र इकारे,कोल्हापूर विभागीय अध्यक्ष धनाजी कराडे,उपाध्यक्ष सागर दिक्षित, विभागीय सचिव मोहन जाधव कोल्हापूर विभागीय सचिव यांच्यासह  सर्व पदाधिकाऱ्यांनी केले.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *