ताज्या घडामोडीव्यवसाय

कांदा खरेदी कुणासाठी?:कुबेर जाधव नाशिक 


केंद्र सरकार ५लाख टन कांद्याची खरेदी करून बफर स्टाॅक करणार?

कांदा खरेदी कुणासाठी?:कुबेर जाधव

नाशिक 

Advertisement

केंद्र सरकारने पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर काढून तयार असलेला रब्बी कांद्याची मापक दरात खरेदी करून त्या उन्हाळ कांद्याचा साखरे सारखा बफर स्टॉक करून ग्राहकांना स्वस्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी५ लाख टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला आहे. यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कुठलेही हीत जोपासलं जाणार नाही.ही सर्व खरेदी ही नाफेड व एनसीसीएफच्या माध्यमातून केली जाणार आहे. यात सर्व सामान्य शेतकरी व त्यांच्या उत्पादक कंपन्यांना वाव दिला जाण्याची शक्यता कमी आहे. या दोन्ही सरकारी संस्थांची आजवरची कांदा खरेदी कशी आणि कुठे केली जाते हा संशोधनाचा विषय आहे. खरेदीत होणारा काळाबाजार, भ्रष्टाचार याला आळा कसा बसनार? या खरेदीमुळे कांद्याचे पडलेले दर कसे नियंत्रणात ठेवले जाणार आहे? याचा फायदा कुणाला?व नुकसान कुणाला होणार आहे? कांद्याच्या उत्पादनात खरंच घट झाली का? देशात किती कांद्याच उत्पादन होणार आहे ? यातील किती कांदा सडतो? किती शिल्लक राहतो? यावर केंद्र सरकार कोणत्या उपाय योजना राबविण्यासाठी प्रयत्न करतं हा उत्सुकतेचा विषय असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *