अकरा हजार व्यंगचित्र साकारून अरविंद गाडेकर यांनी केले स्टेट रेकॉर्ड विक्रम. संगमनेर –
अकरा हजार व्यंगचित्र साकारून अरविंद गाडेकर यांनी केले स्टेट रेकॉर्ड विक्रम.
संगमनेर –
रोज नियमित एक तरी व्यंगचित्र काढण्याचा संकल्प केला आणि अकरा हजार व्यंगचित्र साकारून अरविंद गाडेकर यांनी केला स्टेट रेकॉर्डचा विक्रम. त्यांनी साकारलेल्या व्यंगचित्राची महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद झाली आहे. रेकॉर्ड झालेबाबतचे सर्टिफिकेट त्यांना प्राप्त झाले आहे. त्यांनी रोज काढलेल्या व्यंगचित्राखाली नंबर दिलेले असून हि व्यंगचित्र फायलिंग करून ते व्यवस्थित संग्रहित केली आहेत. कोणतेही व्यंगचित्र रिपीट नाही. प्रत्येक व्यंगचित्राचा विषय वेगळा आहे. अरविंद गाडेकर यांची व्यंगचित्रे अखिल भारतीय मराठी व्यंगचित्र प्रदर्शनात नागपूर,मुंबई,पुणे आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी झालेल्या व्यंगचित्र प्रदर्शनांत प्रसिद्ध झाली आहेत. व्यंगचित्रकला आणि व्यंगचित्रकार बोटावर मोजण्याइतकेच असताना हि कला जिवंत ठेवण्यास अरविंद गाडेकर सतत प्रयत्नशील असतात. अनेक शाळा, कॉलेज, आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांनी व्यंगचित्राचे सादरीकरण केले आहे.राष्ट्रीय एकात्मा , व्यसनमुक्ती, स्त्रीभृण हत्या, मोबाईल एक समस्या आणि इतर सामाजिक संदेश अरविंद गाडेकर रोज सोशल मीडिया आणि वर्तमानपत्र,साप्ताहिक, दिवाळी अंकांत यात व्यंगचित्रे प्रसिद्ध करून देत आहेत. त्यांचे स्वलिखित सासु व्हर्सेस सून या व्यंगचित्राच्या पुस्तकास शब्दगंध साहित्य परिषद यांनी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार दिला आहे. अकरा हजार व्यंगचित्रे साकारणे या स्टेट रेकॉर्डबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.