घरफोडीच्या गुन्हयातील आरोपी मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
घरफोडीच्या गुन्हयातील आरोपी मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहिल्यानगर:-
श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील घरफोडीच्या गुन्हयातील आरोपींना मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,घटनेतील फिर्यादी राजु बापुराव जाधव (रा.घारगाव, ता.श्रीगोंदा) हे दि. 06 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांचे घरी झोपले असता रात्री 02.00 वा.सुमारास अज्ञात आरोपीतांनी घरात घुसून फिर्यादीचे पत्नीस लाकडी दांडक्याने मारहाण करून तिचे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र चोरून नेले.तसेच फिर्यादीस आईस गजाने मारहाण केली आहे.याबाबत बेलवंडी पो.स्टे. येथे गु.र.नं. 339/2024 बीएनएस कलम 331 (6), 305) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल होता.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. दिनेश आहेर यांना जिल्हयातील ना उघड घरफोडीच्या गुन्हयांचा समांतर तपास करणेबाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ/बबन मखरे व पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे,अमोल कोतकर, जालींदर माने,फुरकान शेख व उमाकांत गावडे अशांचे पथक नेमुण आरोपींची माहिती घेणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.तपास पथक बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हयातील आरोपीची माहिती घेत असताना सफौ/बबन मखरे यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा संदेश उर्फ दौल्या संजय भोसले,रा.कोळगाव, ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर याने त्याचे साथीदारासह केलेला असून ते पिंपळगाव पिसाजवळ आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने पिंपळगाव पिसा येथे जाऊन 2 इसमास ताब्यात घेतले. ताब्यातील इसमास त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) संदेश उर्फ दौल्या संजय भोसले,वय 20, रा.कोळगाव, ता.श्रीगोंदा 2)साहिल सुनिल चव्हाण,वय 18, रा.अनकुटे,ता.येवला, जि.नाशिक असे असल्याचे सांगितले. त्यांचे कडे गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा आलुशा उर्फ दिनेश रमेश काळे, रा.मोहोरवाडी, ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर याचे मदतीने केल्याची माहिती सांगीतली. पंचासमक्ष संदेश संजय भोसले याचे अंगझडती घेतली असता त्याचेकडून 35,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यात अर्धा तोळा वजनाचे सोन्याच्या डोरल्याच्या दोन पळया असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी बेलवंडी पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, व श्री.विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी,कर्जत उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

घरफोडीच्या गुन्हयातील आरोपी मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

