क्राईम

स्वाती देवरे विआ मिसेस इंडिया एशिया क्वीन; वीआ एंटरटेनमेंट, जयपूरतर्फे आयोजन ; नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा


 

स्वाती देवरे विआ मिसेस इंडिया एशिया क्वीन;

 

वीआ एंटरटेनमेंट, जयपूरतर्फे आयोजन ; नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा

नाशिक : प्रतिनिधी

वीआ एंटरटेनमेंटने स्त्रीचा नारा घेऊन आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धा वीआ मिस, मिसेस, मिसेस अँड टीन इंडिया २०२४ सीझन ३ चा ग्रँड फिनाले राजस्थान अजमेर रोडवरील रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आला होता. यात नाशिकच्या सटाणा तालुक्यातील आदर्श ग्रामसेविका स्वाती गमनराव देवरे यांनी मिसेस इंडिया एशिया क्वीन हा महाराष्ट्रातून मानाचा पुरस्कार मिळाल्याने नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 

वेस्टर्न, ट्रॅडिशनल, इंडो वेस्टर्न आणि स्पार्कल डिझायनर आउटफिट्सच्या थीमवर एकूण तीन फेऱ्या पूर्ण झाल्या. फॅशन सिक्वेन्समध्ये फिनालेसाठी निवडलेल्या टॉप १० मॉडेल्सने कॅट वॉक केला होता. पारंपारिक पोशाखांनी स्पर्धेला सुरुवात झाली. दुसऱ्या फेरीत सहभागींनी वेस्टर्न कलेक्शनचे प्रदर्शन केले. शेवटच्या क्रमात टॉप ५ फायनलिस्ट मॉडेल्सनी त्यांचे डिझायनर गाऊन कलेक्शन सादर केले. या स्पर्धेत आसाम, हिमाचल, महाराष्ट्र, दिल्ली, ईशान्येकडील मॉडेल्स सहभागी झाल्याचे आयोजक हरीश सोनी यांनी सांगितले. अंतिम फेरीपूर्वी, सर्व सहभागींसाठी ग्रूमिंग सत्र, पोर्टफोलिओ शूट, टॅलेंट राऊंड इत्यादी उपक्रम उद्योग तज्ञांद्वारे आयोजित केले गेले. या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल सेलिब्रिटी गेस्ट म्हणून सहभागी झाली होती.

Advertisement

जीवनी सिंग मिसेस इंडिया इंटरनॅशनल २०२४, स्वाती देवरे मिसेस इंडिया एशिया क्वीन, रितू महाजन मिसेस इंडिया नॉर्थ, सोनिया विज मिसेस इंडिया उत्तर प्रदेश, प्रीती यती मिसेस इंडिया बंगलोर, यामी हँगिंग चेरोम मिस टीन इंडिया अरुणाचल प्रदेश , हिमश्री कलिता मिस इंडिया आसाम , ट्विंकल सिंग मिस इंडिया हिमाचल प्रदेश ,आशी सिंग मिसेस इंडिया पंजाब , नवीशी सिंग मिस टीन इंडिया हरियाणा हा मुकुट त्यांनी त्यांच्या नावावर केला. देवरे यांना या पूर्वीही राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. स्वाती यांना वडील जिल्हा परिषदेचे सेवा निवृत्त अभियंता स्व. गमन राव कृष्णा देवरे यांची प्रेरणा व आशीर्वाद मिळत आहेत. तर पती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिकारी महेश बाळासाहेब बिरारीस यांची खंबीर साथ मिळत आहेत. या पुरस्कारासाठी देवरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *