वसई परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा विश्वास पुनर्स्थापित करणारे सायलेंट कोड डिकोडर
वसई परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा विश्वास पुनर्स्थापित करणारे सायलेंट कोड डिकोडर
…….
“गुन्हेगार शहाणे झाले आहेत, पण आपली नजर त्या शहाणपणाच्या पुढची असली पाहिजे…”
“मॅडम, साधा हॉर्न होता… पण यातून त्यांनी एक कोडच तयार केला!
“कोड असो की क्राइम, शेवटी तो आपल्या नजरेला धोका देऊ शकत नाही.
हा संवाद आहे पोलिस उपायुक्त आणि त्यांच्या पथकातील एका शिलेदारात झालेला. मुद्दा आहे, वसई दरोडा प्रकरणाचा तपास करतांना तपास पथकाने डिकोड केलेली दरोड्यासाठीची हॉर्न सिग्नल प्रणाली. कोण आहेत ते पोलिस आयुक्त? काय आहे हा अनोखा हॉर्न सिग्नल? कुणी केले हे सायलेंट कोडींग डिकोड ?
……….
वसई शहरातील एका उच्चभ्रू, वस्तीत दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी एक दरोडा पडतो.या दरोड्याने मिरा भाईंदर पोलीस ठाणेच नाही तर मुंबईसह महाराष्ट्र पोलीसांमध्ये खळबळवजा अस्वस्थता निर्माण झाली होती.दरोडेखोर चालाख आणि तंत्रज्ञानाचा जुगाड करण्यात तत्पर होते.या टोळीने वसईसह अन्य ठिकाणी दरोडा टाकतांना वापरलेली जुगाड शक्कल पोलिसांपासून त्यांना वाचवत होती.या दरोडेखोरांनी वसईचा दरोडा टाकतांना प्रचंड खबरदारी घेतली असल्याने मागे काहीच धागेदोरे सोडले नव्हते. परिमंडळ दोनच्या उपायुक्तांनी या दरोड्याचा तपास हाती घेतला.घटना स्थळाचे पोलीसी नजरेने निरिक्षण केले.परिसराची पहाणी केली.सीसीटीव्ही फुटेज तपासले.फुटेजमधील एका दृश्याने पोलीस उपायुक्तांचे लक्ष वेधून घेतले.जिथे नजर थांबली ते दृश्य पुन्हा पुन्हा पाहिले.आणि दरोडेखोरांनी केलेला जुगाड पोलीसी नजरेने अचूक हेरला. फूटेज तपासत असताना एक विचित्र गोष्ट त्यांच्या लक्षात आली.दरोडेखोरांच्या प्रत्येक हालचालीनंतर एक गाडी तीन वेळा हॉर्न वाजवते.ही गोष्ट पोलीस उप आयुक्तांना खटकली.तपास अधिक खोलवर करण्याच्या दिशेने उपायुक्तांनी सुरूवात केली.शोधाशोध केल्यानंतर एक गाडी मिळाली,गाडीची तपासणी केल्या नंतर त्यातील हॉर्नला एक “साऊंड चिप” जोडलेली आढळली.हाच होता गुन्हेगारांनी तयार केलेला ‘हॉर्न कोड’.अधिक तपास केल्यानंतर दरोडेखोरांनी हे नवे तंत्र विकसीत केले असल्याचे लक्षात आले.
कसा होता तो हॉर्न सिग्नल?
गुन्हेगारांनी सामान्य गाड्यांमध्ये असा कस्टमाइज्ड हॉर्न बसवला होता, जो विशिष्ट संगीत किंवा सिग्नल साऊंड देत असे.उदाहरणार्थ:
1 वेळ “तयार रहा”
2 वेळा “सुरक्षित मार्ग”
3 वेळा “सामान घेऊन निघा”
4 वेळा “धोका – माघार घ्या”
याचा उपयोग चोरी किंवा दरोडा टाकतांना एकमेकांना सूचित करण्यासाठी केला जात होता . म्हणजे मोबाइल किंवा वायरलेसचा वापर न करता पोलिसांच्या नजरेत न येता “सिग्नल” द्यायचा आणि मोहीम फत्ते करायची.
पोलिसांनी कसा केला उलगडा ?
परिसरातील CCTV फूटेज तपासताना एका विशिष्ट व्हिडिओमध्ये एका गाडीचा हॉर्न साऊंड वारंवार आणि विशिष्ट पद्धतीने ऐकू येतो.” त्यावरून पोलिसांनी त्या गाडीचा माग काढला आणि संशयित आरोपी पर्यंत पोहोचले.आणि तपासात उघड झाले की, त्या टोळीने चोरीच्या वेळेस सहकाऱ्यांना सावधानतेच्या सुचना देण्यासाठी “हॉर्न कोड” तयार केला होता.हे एक नवे आणि क्लिष्ट “साइलेन्ट कोडिंग” टेक्निक, डिकोड करण्याचे काम केले त्या पोलीस अधिकारी आहेत,मिरा भायंदर पोलीस आयुक्तालय परिमंडळ दोनच्या उपायुक्त पौर्णिमा निलेश चौगुले-श्रिंगी. चौगुले-श्रिंगी यांच्या नेतृत्वाखालील टीमने तांत्रिक आणि मानसिक विश्लेषण करून हा दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणला.
….पौर्णिमा चौगुले श्रिंगी या सध्या मिरा भायंदर पोलीस आयुक्तालय परिमंडळ दोनच्या उपायुक्त आहेत.नायगाव फायरींग आणि “Give Way to Ambulance” मोहीमेत त्यांची महत्वाची भुमिका आहे.
गुन्हे उकल,पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन ,बंदोबस्त आदी पोलीस खात्यातील पारंपारिक जबाबदारी पार पाडीत असतांना पोलीस खात्याची एकूण कार्यक्षमता संवर्धित करण्यासाठी देखील त्यांचे योगदान मोलाचे ठरत आहे.
प्रमुख कामगिरी आणि उपक्रम
1. संवादकौशल्य सुधारणा प्रशिक्षण
झोन दोन अंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी इंग्रजी बोलणे आणि लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी मिभाववि आयुक्तालयात खास प्रशिक्षण शिबीराची सुरुवात केली.
या उपक्रमासाठी त्यांनी स्वतःच हस्तक्षेप करून १५ नवीन भरती झालेल्या कॉन्स्टेबलांसाठी शिकवणी सुरु केली. या प्रशिक्षणाचा उद्देश मुख्यतः ईमेल, डिजिटल संवाद आणि आधुनिक गुन्हेगारी तक्रारी हाताळण्यासाठी योग्य संवाद कौशल्ये विकसित करणे हा होता .
2.वसई दरोड्यात महत्वाचे डिकोडींग
10 जानेवारी 2025 रोजीच्या वसईमध्ये पडलेल्या मयंक ज्वेलर्स दरोड्यात ७१ लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला होता.त्या प्रकरणाच्या तपासातही उपायुक्त चौगुले‑श्रिंगी यांनी ‘ महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
गुन्हेगारांसाठी वापरले गेलेल्या अनोख्या हॉर्न सिग्नलचा शोध घेऊन, त्यांच्या मदतीने गुन्हेखोरांना पकडण्यात मेहनत घेतली होती. त्यातले सर्व आरोपी हिस्ट्री शिटर होते,हे विशेष.
मुख्यमंत्र्यांच्या 100‑दिवसांचा कार्यक्रम (जानेवारी 2025) अंतर्गत MBVV आयुक्तालयाने राज्यातील सर्व आयुक्तालयांमध्ये Top Rank (84.57%) पटकावली असून, यात आधुनिकपणे तंत्रज्ञान वापर, नागरिक सहभाग, एआई‑आधारित तपास प्रणाली, डिजिटल तक्रार निवारण, स्मार्ट ई‑बीट पेट्रोलिंग, QR‑आधारित अभिप्राय यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे .
तंत्रज्ञान‑आधारित सुधारणा:
आयबीक्स (I‑Bikes), WhatsApp आधारित चिन्हाकर्श प्रणाली, AI‑चालान प्रणाली, फास्ट नागरिक प्रतिसाद (QR‑reviews), ISO‑स्तरीय गुणवत्तापूर्ण पोलीस सेवा यांसारखे आधुनिक सुधारणा उपक्रम राबविण्यात आल्या आहेत .
सारांशः
उद्दिष्ट कामगिरी संवादकौशल्य वाढ, गुन्हेगारी प्रकरणे सोडवणे, प्रशिक्षण, सुरक्षा उपक्रम
उपक्रम इंग्रजी संवाद प्रशिक्षण, Vasai heist तपास, ISO‑स्तरीय सुधारणा, AI‑आधारित सेवा
कॉमिशनरेट परफॉर्मन्स राज्यातील सर्वोत्तम आयुक्तालय म्हणून समावेश (84.57%)
DCP पौर्णिमा चौगुले‑श्रिंगी यांनी समर्पित नेतृत्व, नवोन्मेशक दृष्टिकोन, सखोल तपास आणि संवाद क्षमता यांचा योग्य अभ्यास करून झोन दोन मध्ये महत्वपुर्ण सुधारणा घडवून आणल्या आहेत.
त्यांच्या नेतृत्वाखालील विभागाने नागरिकांशी संवाद साधणे, तत्पर प्रतिक्रिया देणे, आणि गुन्हेगारी तपासात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या सर्व बाबी प्रभावीपणे राबवल्या आहेत.
आयुक्तालयाचा प्रगती पथावर जाणारा हा धोरणात्मक मार्ग, त्यांची महत्वाकांक्षा आणि कार्यक्षमतेचे उदाहरण म्हणून नोंदविला जातो.
DCP पौर्णिमा चौगुले-श्रिंगी या केवळ एक महिला IPS अधिकारी नसून, त्या एक नेतृत्वशील, दूरदृष्टी असलेल्या आणि नागरिकाभिमुख प्रशासन उभारणाऱ्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे वसई परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा विश्वास पुनर्स्थापित झाला आहे.
-कुमार कडलग, नाशिक

