पोलीस अधीक्षकांच्या विश्वासाला वणी पोलिसांची सलामी; दिंडोरीत टोमॅटोच्या आडून गांजाची शेती, पोलिसांकडून छापा
पोलीस अधीक्षकांच्या विश्वासाला वणी पोलिसांची सलामी;
दिंडोरीत टोमॅटोच्या आडून गांजाची शेती, पोलिसांकडून छापा
नाशिक प्रतिनिधी
कोणत्याही अंमली पदार्थाची तस्करी करण्याचा प्रकार वणी पोलीसांनी हाणून पाडण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत भातोडे, ता. दिंडोरी शिवारात टोमॅटो लागवड केलेल्या शेतात गाजांची समिश्र शेती आढळून आल्याने वणी पोलिसांनी छापा टाकण्यात आला आहेत. त्यामुळे अशा प्रकारचा व्यवसाय करणाऱ्या कुणालाही सोडले जाणार नाही असा ईशारा वणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिला आहे टोमॅटो लागवड केलेल्या शेतात गाजांची समिश्र शेती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून सुमारे ४१ लाख ८६ हजार ४०० रुपये किंमतीचे २०९.३२ किलो ग्रॅम वजनाची गांजाची झाडे वणी पोलिसांनी जप्त केली आहे. भातोडे, ता. दिंडोरी शिवारातील शेती गट नं. ८ मध्ये रंगनाथ सोनू चव्हाण, वय ५२ यांच्या टोमॅटोच्या शेतात सरीवर ठिकठिकाणी गांजाच्या झाडे लावले असल्याची गुप्त माहीती वणी पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या अनुशंगाने वणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल पाटील, पोलिस उपनिरीक्षक गणेश कुटे यांच्यासह पोलिस पथकाने शुक्रवार दि. १३ रोजी सांयकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास गट नं. ८ मध्ये जावून छापा टाकला. यावेळी टोमॅटोच्या शेतातील सरीवर ठिकठिकाणी लावलेली ५ ते ६ उंचीची गांजाची झाडे आढळून आली. यावेळी पोलिस पथकाने पंचनामा करीत ही झाडे मुळासगट उपटुन संकलीत केली. खोड, पान, फांदया, फूल व बांड असलेली साधारण ५ ते ६ फुट उंचीची गांजा सदृश्य झाडे गोण्यात भरुन त्याचे वजन केले असता २०९.३२ किलो ग्रॅम भरले. बाजारपेठेनूसार या झाडांची अंदाजीत किमंत ४१ लाख ८६ हजार ४०० इतकी आहे. गांज्या सदृश्य झाडे लागवड केलेले संशयीत रंगनाथ चव्हाण हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याचे उद्देशाने लागवड करुन जोपासना करीत असल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन 1985 चे कलम 20 व 22 (क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांनी भेट देवून पाहाणी केली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल पाटील हे अधिक चौकशी करीत आहे. वणी पोलिसांच्या या स्तुत्य कामगिरीबदल बरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग किरणकुमार सुर्यवंशी यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोनि रघुनाथ शेगर, वणी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील, पोउनि गणेश कुटे, सपोउनि अंबादास जाडर, पोहवा संदिप बच्छाव, पोना वसंत साबळे, पोकों नितीन तेलंगे, रमेश चव्हाण, तुषार सोनवणे यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.