क्राईम

जालनामध्ये एसटी बस- टेम्पोची समोरासमोर धडक;  २ प्रवाशांचा मृत्यू


जालनामध्ये एसटी बस- टेम्पोची समोरासमोर धडक;

 २ प्रवाशांचा मृत्यू

 

 

नाशिक /किरण कोष्टी

 

जालनामध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. एसची बस आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर २० प्रवासी जखमी झाले आहेत.

 

 

प्रवाशांनी फुल्ल भरलेली एसटी बस आणि भरधाव टेम्पो ट्रकची धडक झाल्याने भीषण अपघाताची घटना जालन्याच्या नाव्हा शिवारामध्ये घडली आहे.

Advertisement

हा अपघात इतका भीषण होता की, दोन ते तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. घटनेतील ट्रेम्पो ट्रक चालक मद्य पिऊन वाहन चालवित असल्याची प्राथमिक माहिती उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगरहून ही बस माहुरगडकडे येताना टेम्पोने पुढील एसटीच्या पुढच्या बाजूस धडक दिल्याने एसटी महामंडळाच्या बसचा समोरील भागाचा अक्षरशः चेंदामेदा झाला आहे.

 

दरम्यान, या अपघातात दोन तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. ही एसटी बस जालन्याकडून मेहकरच्या दिशेने जात होती. त्यावेळी मेहकरच्या दिशेने येणाऱ्या टेम्पो ट्रकने बसला जोरदार धडक दिली. त्यामुळे बसच्या पुढी भागात बसलेल्या दोन ते तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी पोलिसांकडून मदत कार्य सुरु आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *