व्यंकटेश मोरे यांची महाराष्ट्र इनडोअर हॉकी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड
व्यंकटेश मोरे यांची महाराष्ट्र इनडोअर हॉकी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड
नाशिक:प्रतिनिधी
महाराष्ट्र इनडोअर हॉकी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी श्री. व्यंकटेश मोरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे महाराष्ट्रातील इनडोअर हॉकी खेळाचा प्रचार आणि प्रसार अधिक वेगाने होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र इनडोअर हॉकी असोसिएशन ही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यरत संस्था आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देणे, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे यशस्वी आयोजन करणे यामध्ये संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
व्यंकटेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली इनडोअर हॉकीच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल. जिल्हा व तालुका स्तरावर खेळाचा प्रसार वाढवून, राज्यातील प्रतिभावान खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळवून देणे हे त्यांचे उद्दिष्ट असेल.
असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, खजिनदार अश्पाक अहमद शेख, तसेच उपाध्यक्ष नंदकुमार खैरनार यांनी मोरे यांचे अभिनंदन केले.