क्राईम

….तर महाराष्ट्रात तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा ; मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक मुंबईत संपन्न


….तर महाराष्ट्रात तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा ;

 

मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक मुंबईत संपन्न

 

☝️☝️☝️☝️☝️☝️☝️

मराठी संस्कृती जतन करा 

 

मुंबई प्रतिनिधी

 

मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक मुंबई येथे पार पडली. या बैठकीत बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच कै.संतोष देशमुख यांची निर्घृण व अमानवी पद्धतीने झालेल्या हत्येचा तीव्र निषेध करण्यात आला. मराठा समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून,राज्य सरकारने या प्रकरणात कठोर भूमिका घेतली नाही, तर महाराष्ट्रभर प्रचंड जनआंदोलन उभे करण्यात येईल,असा इशारा मराठा समाजाने यावेळी दिला आहे.

 

मुख्य मागण्या आणि निर्णय:

सरपंच कै.संतोष देशमुख यांच्या हत्येमागील आरोपींना तात्काळ 302 अंतर्गत गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा मिळावी,असा ठाम आग्रह यावेळी व्यक्त करण्यात आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणातील आरोपींना कोणत्याही प्रकारचे अभय न देता कठोर कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली.

 

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीतील ठराव:

 

1. धनंजय मुंडे यांची हकालपट्टी: कै. संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून हटवावे.

 

2. वाल्मिक कराड यांच्यावर कठोर कारवाई: वाल्मिक कराड यांना सरपंच हत्येच्या गुन्ह्यात सहभागी करून फाशीची शिक्षा द्यावी, तसेच धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे.

 

3. कर्तव्यातील कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई: संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सहआरोपी म्हणून गुन्ह्यात सहभागी करावे.

 

4. मोर्चा: 28 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन.

Advertisement

 

5. पोलिस संरक्षण: कै. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना आणि मस्साजोग गावाला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे.

 

6. आर्थिक मदत: कै. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना मराठा समाजाने आर्थिक मदतीसाठी पुढे यावे.

 

7. बिंदूनामावलीची चौकशी: बीड जिल्ह्यातील वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि चौकशीद्वारे न्याय द्यावा.

 

8. ED चौकशी: वाल्मिक कराड यांच्या आर्थिक व्यवहारांची ED मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.

 

9. सार्वजनिक कार्यक्रमांवर बहिष्कार: धनंजय मुंडे यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे कार्यक्रम मराठा क्रांती मोर्चा आयोजित होऊ देणार नाही.

 

10. मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्याचे पालकत्व घ्यावे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावे व कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित करावी.

 

या बैठकीसाठी नाशिक जिल्ह्यातून मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर,नानासाहेब बच्छाव, विलास पांगरकर,आशिष हिरे,नवनाथ शिंदे,भारत पिंगळे,वैभव दळवी,राहुल काकळीज ज्ञानेश्वर थोरात,सागर पवार, ललित उशीर यांच्यासह राज्यभरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

“बीड येथे होणाऱ्या सर्वपक्षीय सर्व जाती धर्माचा सोबत घेऊन होणाऱ्या 28 तारखेच्या मोर्चाला नाशिक जिल्ह्यातून हजारो समाज बांधव उपस्थित राहतील तसेच महाराष्ट्रभर आंदोलनाची तयारी पूर्ण झाली असून राज्य सरकारला आता शांततेच्या मार्गाने आम्ही

सरपंच कै.संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी मराठा समाज एकत्र असून,सरकार व न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. परंतु,या विश्वासाला तडा गेल्यास परिणाम राज्य सरकारला परवडणारे ठरणार नाही”.

 

-करण गायकर

मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *