क्राईम

कराड बंधू भेळभत्ता हल्ला प्रकरणाचा उलगडा दीपावलीच्या विश्रांती नंतर पुन्हा निनादला    कायद्याचा बालेकिल्ला 


कराड बंधू भेळभत्ता हल्ला प्रकरणाचा उलगडा

दीपावलीच्या विश्रांती नंतर पुन्हा निनादला 

  कायद्याचा बालेकिल्ला

नाशिक शहरात कराड बंधू भेळभत्ता दुकानावर झालेल्या कोयत्याच्या हल्ल्याचा अखेर पोलिसांनी काही तासांतच उलगडा केला आहे. गुंडा विरोधी पथकाने तात्काळ कारवाई करत एक गुन्हेगार आणि दोन विधी संघर्षीत बालकांना ताब्यात घेतलं आहे.

दिनांक २९ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता द्वारका परिसरातील कराड बंधू विवडा व भेळभत्ता दुकानावर तोंडावर मास्क लावलेले तीन युवक आले. त्यांनी दुकानावर विटा फेकल्या आणि धारदार कोयत्याने काउंटरवर वार करत शेजारील ‘उत्तम पेढा सेंटर’च्या काचाही फोडल्या होत्या.

या प्रकरणात विक्रांत कराड यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि हत्यार कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला.

Advertisement

घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. परंतु पोलीस आयुक्त संदीप कर्णीक यांच्या आदेशानुसार गुंडा विरोधी पथकाने वेगाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पथकाने समता नगर परिसरात धाड टाकली.

त्यात प्रेम प्रदीप गांगुर्डे या १९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्यासोबत दोन विधी संघर्षीत बालके असल्याचं सांगितलं. चौकशीतून समोर आलं की काही महिन्यांपूर्वी दुकानातील यश बत्तीसे या मुलासोबत झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी त्यांनी हा हल्ला केला होता.

गुंडा विरोधी पथकाने तिघांनाही अटक करून पुढील कारवाईसाठी मुंबईनाका पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केलं आहे.

नाशिक पोलिसांच्या तात्काळ आणि अचूक कारवाईमुळे दिवाळीच्या विश्रांतीनंतर शहरात पुन्हा एकदा कायद्याचा बालेकिल्ला हा जयघोष निनादल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवरील विश्वास दृढ झाला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *