क्राईम

फास घेतलेला मुलाचा मृतदेह खाली उतरवून, बापानेही त्याच झाडावर घेतला फास! हृदय पिळवटून टाकणारी घटना 


फास घेतलेला मुलाचा मृतदेह खाली उतरवून, बापानेही त्याच झाडावर घेतला फास!
हृदय पिळवटून टाकणारी घटना 
       ....मराठी संस्कृती जतन करा…..
………………..

बिलोली:

 एकीकडे वाममार्गाने मिळवलेली संपत्ती, दडवता दडवता झालेली दमछाक, कधीकाळी कफल्लक असलेल्या भाजीपाला विकता विकता गडगंज संपत्तीचा हिशोब देता देता नाकी नऊ येत असताना, दुसरीकडे मिनकी ता बिलोली येथे काळीज पिळवटून टाकणारी  घटना घडली आहे.
मिनकी ता बिलोली जिल्हा नांदेड येथील काळीज पिळवटून टाकणारी ही घटना आहे.
उदगीर येथील एका माध्यमिक  शाळेत दहावीत शिकणारा ओमकार लक्ष्मण पैलवार नावाचा १६ वर्षाचा मुलगा मकर संक्रांतीच्या निमित्ताने गावी (मिनकी) आला. घरी येऊन सणानिमित्त नवीन कपडे आणि शिक्षणाचे साहित्य घेऊन देण्याची वडिलांकडे हट्ट धरला.वडील राजेंद्र पैलवार यांनी सध्या आपल्याकडे पैसे नाहीत, सोयाबीनला भाव नाही,पैसे आले की तुला नवीन कपडे आणि पुस्तकं, वह्या, घेऊन देईन असे सांगितले.
पण ओमकारच्या मनात कसले विचार आले त्यालाच ठाऊक? तो सकाळी लवकर उठला आणि सरळ शेतात गेला, आणि बांधावर असलेल्या झाडाला गळफास लावून तिथेच स्वतःच आयुष्य संपवून घेतल.
मुलगा (ओमकार) घरी आला नाही म्हणून आई वडील, भाऊ,सर्वांनी शोध घ्यायला सुरुवात केली. शोधत शोधत वडील शेताकडे आले, पाहतो तर मुलगा झाडाच्या फांदीवर लटकत होता. मुलाने फाशी घेतल्याची कसलीच माहिती घरच्यांना न देता  वडील लगेच झाडावर चढले, मुलाच्या मृतदेहाला अलगद खाली सोडून जमिनिवर त्याला जागेवर झोपवले.आणि मुलाने ज्या दोरीने फाशी घेतली त्याच दोरीने त्याच झाडावर त्याच क्षणी वडीलही फाशी घेऊन  त्याच झाडावर  स्वतःचे जीवन संपवले.
मुळात शेतकरी असलेल्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो. एव्हढंच आपण या क्षणी म्हणू शकतो.
प्रश्न हा नाही की,वडिलांनी असे का केले?
प्रश्न हा आहे,की देशात राजकारण्यांकडे आपण विचारपण करु शकत नाही, एव्हढा  पैसा कसा काय आला आहे?
पण जो शेतकरी रात्र दिवस फक्त कष्टच करतो. त्याच्याकडे, त्याच्या लेकरा बाळासाठी कपडे लत्ते घेण्यासाठीही  पैसा शिल्लक राहत नसतो? ही दरी कशी भरून निघणार?
कुबेर जाधव,
समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *