श्री नेमिनाथ जैन विद्यालयात नायलॉन मांजा प्रतिबंध प्रतिज्ञेने सामाजिक जनजागृती चार वर्षांपासून राबवला जातोय नो नॉयलॉन मांजा उपक्रम
श्री नेमिनाथ जैन विद्यालयात नायलॉन मांजा प्रतिबंध प्रतिज्ञेने सामाजिक जनजागृती
चार वर्षांपासून राबवला जातोय नो नॉयलॉन मांजा उपक्रम
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
…………………………………………………………………………….
धनंजय पाटील /चांदवड
श्री नेमिनाथ जैन विद्यालयात नायलॉन मांजा प्रतिबंध प्रतिज्ञा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
श्री नेमिनाथ जैन विद्यालयातील हरित सेना विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने नायलॉन मांजा प्रतिबंध प्रतिज्ञा घेण्यात आली. ही प्रतिज्ञा घेण्याचे हे 4 थे वर्ष असून या कार्यक्रमाप्रसंगी विजय लोखंडे वनपाल, अण्णा लोखंडे वनरक्षक, अश्विनी सोमवंशी वनरक्षक सामाजिक वनीकरण विभाग चांदवड, तसेच विद्यालयाचे उपप्राचार्य देवेंद्र राज जैन, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील, विद्यालयातील हरित सेना विभाग प्रमुख रोशन नेरकर, क्रीडा शिक्षक महेश देवरे यांच्या उपस्थितीत सामाजिक जनजागृती करणारी प्रतिज्ञा घेण्यात आली.
नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात येणाऱ्या मकरसंक्रांतीनिमित्त आपण सर्व हा सण साजरा करतांना मोठ्या प्रमाणत पतंगोत्सव खेळत असतो. या वेळी आपण मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा किंवा काचेची पूड असलेला दोरा वापरत असतो. परंतु यामुळे आपल्या सारख्या दुचाकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच आपल्या परिसरात असणाऱ्या प्राणी आणि पक्ष्यांना यामुळे खूप मोठ्या प्रमाणात इजा होत असते. तसेच हा दोरा विजेच्या तारांना अडकल्यास गंभीर दुर्घटना होतात हे टाळण्यासाठी आपण नायलॉन मांजा वापर कटाक्षाने टाळावा याबाबत विद्यालयाचे हरीत सेना प्रमुख रोशन नेरकर यांनी विद्यार्थ्यांना उद्बोधन केले. तर वनरक्षक अश्विनी सोमवंशी यांनी नायलॉन मांजा चा वापर करणे कायद्याने गुन्हा आहे आपण त्याचा वापर करू नये अशा आशयाचे मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांनी ‘मी नायलॉन मांजा वापरणार नाही’, ‘मांजा हटाव पर्यावरण बचाव’ अशा घोषणा देत नायलॉन मांजा प्रतिबंध प्रतिज्ञा घेतली.
या समाजपयोगी उपक्रमाचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख यांनी कौतुक केले.