भोंदू बाबाचा विवाहितेवर बलात्कार ; भूत बाधा झाल्याचा बनाव करून अत्याचार
भोंदू बाबाचा विवाहितेवर बलात्कार ;
भूत बाधा झाल्याचा बनाव करून अत्याचार
नाशिक प्रतिनिधी
अंबड परिसरातील विवाहितेवर पोटदुखीच्या इलाजासाठी वडाळागावातील संशयित भोंदूबाबाकडे नेण्यात आले. त्यावेळी संशयित भोंदू बाबाने तिला भूतबाधा झाल्याचे सांगून तिच्यावर उपचार सुरू केले. यादरम्यान तिला गुंगीचे औषध देत त्याने बलात्कार केला. तसेच याबाबत वाच्यता केल्यास मारून टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात संशयित भोंदूबाबाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हुसन यासीम शेख (रा. मेहमूद नगकर गल्ली नंबर-२, वडाळागाव) असे संशयित भोंदूबाबाचे नाव आहे. पीडित १९ वर्षीय विवाहितेचे पोट दुखत असल्याने पती, सासूच्या सल्लाने वडाळागावातील हकिमाकडे उपचारार्थ नेले होते. वारंवार पोट दुखत असल्याने शुक्रवारी (ता. २६) पीडिता हुसनकडे आली. त्याने पीडितेला भूतबाधा झाल्याचे सांगत तिच्यावर उपचार सुरू केले. या दरम्यान तिच्यावर गुंगीकारक औषध दिल्याने पीडितेची शुद्ध हरपून ती बेशुद्ध झाली. तेव्हा त्याने अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. दरम्यान, हुसनला अटक झाली असून त्याला न्यायालयाने ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास सहायक निरीक्षक सुनील अंकोलीकर करत आहेत.