ताज्या घडामोडीसामाजिक

हिरकणी फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन


हिरकणी फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

सिन्नर प्रतिनिधी
हिरकणी फाउंडेशनच्या वतीने नाशिक रोड व देवळाली गाव तसेच विहितगाव येथिल नागरीकांसाठी नेत्र तपसणीचा व जनरल चेकप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
विहीतगाव येथील प्रती पंढरपुर विठ्ठलमंदिरात हिरकणी फाउंडेशनच्या वतीने ह्या भव्य आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नेत्र तपासणीत ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन मोफत करुन देण्यात येईल तसेच शरीराच्या मधुमेह , उच्च रक्तदाब ,ईसीजी, बीएमआय , अश्या विविध आजारांच्याही तपासण्या करण्यात आल्या.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव भाजपा ग्रामिण उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष शंकरराव वाघ , ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव डॉक्टर दीप्ती पापरीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले . हिरकणी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर शितल विसावे , व हिरकणी फाउंडेशन उपाध्यक्ष गीता उगले यांच्या संकल्पनेतून हे शिबीर राबविण्यात आले. या शिबिराचा परिसरातील सर्व नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी डाॅ. स्वाती आहेर , डाॅक्टर दिनेश नेमन , डाॅक्टर अशोक आवरे , डाॅक्टर संजय विसावे , विजय ऊगले , किरण देशमुख , पद्मजा जाधव, महेश शिरसाठ, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला सर्व चर्मकार समाज बांधव व अशोक पवार यांच्या समवेत , स्वप्नील बोराडे , विजय उगले, जया ऊगले, क्रिश ऊगले, सबुरी उगले , हांडगे माऊशी व सार्वजनिक मंडळाच्या जेष्ठ महिला भजनी मंडळ महिला नागरीक ऊपस्थीत होत्या.

Advertisement

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.शितल विसावे यांनी केले तर आभार प्रदर्शन गिता ऊगले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल डाॅक्टर शितल विसावे यांनी हिरकणी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा गीता उगले यांचा सत्कार केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *