जिप निवडणुकीची तुतारी ? इच्छुकाची वेगवान तयारी शिरसाटे (धारगाव) जि.प. गटावर इच्छुकांच्या उड्या
जिप निवडणुकीची तुतारी ? इच्छुकाची वेगवान तयारी
शिरसाटे (धारगाव) जि.प. गटावर इच्छुकांच्या उड्या
—————
इगतपुरी /नवनाथ गायकर
————
प्रदिर्घ काळ लांबलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आता कोणत्याही क्षणी जाहिर होणार आहेत. गेल्या वर्ष दिड वर्षापासुन निवडणुकीची जय्यत करणार्या इच्छुकांनी, निवडणुकीची तुतारी कधीही फुंकेल तयारी असु दयावी म्हणत हालचालीनां प्रारंभ केला आहे. यामुळे ऐन पावसाळयात राजकिय वातावरण गरम होऊ लागले आहे.
शिरसाटे (धारगाव) जि.प. गटावर अनेक इच्छुकाचां डोळा असुन या गटात मातब्बराच्यां लढती रंगण्याची चित्रे दिसुन येत आहे.
या गटातुन सर्वाधिक चर्चित नाव हे डॉ.महेन्द्र शिरसाट या युवा तरुणाचे आहे.ते आमदार हिरामन खोसकर व माजी जि.प. सदस्य गोरख बोडके, अँड. संदिप गुळवे यांचे कट्टर समर्थक आहेत.त्यांनी आपली इच्छा जाहिर केलेली असुन वाढदिवस, हॉस्पीटल उद्धघाटन अशा भव्य कार्यक्रंमातुन त्यांनी जोरदार हवा केली.त्यांना भरभरुन प्रतिसादही मिळतो आहे.हल्ली भावी जि.प. सदस्य म्हणुन त्यांचे फोटो व बँनर सोशल मिडीयावर वेगाने झळकत आहेत.
डॉ.शिरसाट हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते असुन त्यांच्या नावाचा सर्वत्र बोलबाला झाला आहे.गटातील त्यांचे गाव कावनई हे जास्त मतदार संख्या असलेले गाव असून नाती गोतीही अनेक गावात असल्याने त्यांचे पारडे जड असल्याची चर्चा आहे. शिवाय वैद्यकीय सेवेच्या माध्यमातुन सेवाभावी वृत्तीमुळे त्यांची लोकप्रियता बरीच आहे.
हा गट एकेकाळी कॉग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र गोरख बोडके या युवकाने या बालेकिल्ल्यास सुरुंग लावत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे खेचुन आणला.शिवसेनेचीही या गटावर पकड असुन गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेसला धुळ चारत माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या पत्नीने येथुन बाजी मारली होती.
सध्या या दोन्ही पक्षात वरिष्ठ पातळीवर फुट पडलेली असली तरी अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे येथे आजही वर्चस्व आहे.तुलनेत शिवसेना व उबाठा गटाचे येथे सारखेच प्रमाण दिसुन येते आहे.
आघाडी व युती जर झालीच तर युतीकडुन ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला तर आघाडीकडुन ही जागा उबाठा गटाला सुटण्याची शक्यता आहे.
दरम्यान आघाडी वा युती झालीच तर वैयक्तिक हेवेदावे बाजुला ठेऊन लोकप्रतिनिधी, नेते व कार्यकर्ते एकमेकास सहकार्य करतील कि विधानसभा निवडणुकीप्रमाणेच एकमेकाच्या गळयात तंगडया घालुन पाडापाडीचे राजकारण करतील ? असा सवाल देखील तालुक्याचे राजकारण अस्वस्थ करीत आहेत.
इगतपुरी तालुक्यापुरतं बोलायचं झालं तर विदयमान आमदार हिरामण खोसकर (रा.कॉ.अ.प.गट) यांचेसह माजी आमदार निर्मला गावित, काशिनाथ मेंगाळ , पांडुरंग गांगड (शिवसेना)व शिवराम झोले (रा.कॉ.अ.प.गट) हे परस्परविरोधी लढणारे नेते आज महायुतीत आहेत .या शिवाय माजी जि.प.सदस्य गोरख बोडके, अँड. संदिप गुळवे, उदय जाधव (रा.कॉ.अ.प.गट), भास्कर गुंजाळ (भाजप) हे ही आता महायुतीत आहेत.हे सगळेच महत्त्वाकांक्षी नेते एकाच ठिकाणी असल्याने आगामी काळात यांचे एकमेकांशी कितपत जमेल हाही सवाल आहेच.

