नाशिक जिल्हा बँक कोणी डबघाईस आणली याचा शेतकऱ्यांनी शोध घ्यावा – मात्र व्याजमुक्तीसाठी प्रयत्न करणार – छगन भुजबळ इशारा :अन्यथा जिल्हा बँक आम्हीच बुडवणार — भागवतराव सोनवणे
नाशिक जिल्हा बँक कोणी डबघाईस आणली याचा शेतकऱ्यांनी शोध घ्यावा – मात्र व्याजमुक्तीसाठी प्रयत्न करणार – छगन भुजबळ
इशारा :अन्यथा जिल्हा बँक आम्हीच बुडवणार — भागवतराव सोनवणे
येवला |प्रतिनिधी:
नाशिक जिल्ह्यातील 54 हजार 40 शेतकऱ्यांकडे मध्यम मुदतीचे ₹902 कोटी मुद्दल थकीत आहे. या मुद्दलीचे व्याज ₹1200 कोटीवर गेले आहे.
थकीत शेतकरी जिल्हा बँकेच्या जप्तीच्या कारवाईमुळे देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे.
राज्य शेतकरी समिती आणि कर्जमुक्ती अभियान नाशिक जिल्हा बँक यांच्या प्रतिनिधींनी राज्याचे जेष्ठ मंत्री नामदार छगन भुजबळ यांना जिल्हा बँकेत शेतकऱ्यांच्या बाजूने उभे रहावे, मध्यम मुदतीच्या कर्जास संपूर्ण व्याजमुक्ती मिळवून द्यावी असे साकडे घातले.
मध्यम मुदत कर्जावरील “शून्य टक्के व्याज” योजना व 10 सुलभ हप्त्यांमध्ये परतफेडीची सवलत दिल्यासच परतफेड करू, अन्यथा 1 रुपया देखील भरणार नाहीं, अशी भूमिका राज्य शेतकरी संघटना समन्वय समिती अध्यक्ष भगवान बोराडे यांनी मांडली…
नाशिक जिल्ह्यातील 775 दिवसांपासून सुरू असलेल्या शांतीपूर्ण आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आजवर स्पष्ट भूमिका न घेतल्याने नाशिक जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे.
54 हजार शेतकऱ्यांपैकी सुमारे 8 हजार शेतकरी हे येवला विधानसभा मतदारसंघातील आहेत.
म्हणून यावर मंत्री छगन भुजबळ यांनीच पुढाकार घ्यावा, अशी मागणी नानासाहेब बोंबले यांनी केली…
यावेळी सुधाकर ठोंबरे,मुक्ती क्टर गणेश जेजुरकर, छबू सोमासे, माधव बोंबले, अनिल कदम, नवनाथ निकम, एकनाथ भालेराव, भाऊसाहेब सोमासे आदिसह कर्जदार शेतकरी उपस्थित होते.
तर आम्हीच जिल्हा बँक बुडवणार:इशारा
“संपूर्ण व्याज माफी दिल्यास आणि मुद्दल भरून निरंक दाखले दिल्यासच 54 हजार शेतकरी मुद्दल भरतील,
अन्यथा बँकेचा 13 वा आणि श्राद्ध आता ठरलेले आहे.
कुठल्याही जप्ती व वसुली, ताबा अधिकारी, पोलीस बळ यांना बांधाच्या आत येऊ देणार नाही.
राज्य सरकार आणि बँक यांनी व्याजाचा बोजा सहन करावा…
Advertisementव्याजाची थकहमी सरकारने द्यावी, अन्यथा जमीनी लिलावात गेली तरी चालेल, पण शांततेच्या मार्गाने केलेले आंदोलन जर सरकारला मान्य नसेल तर आगामी काळात शेतकरी आत्महत्या होतील…
आणि जिल्हा बँकेचे श्राद्ध आम्हीच घालू…
आम्ही मुद्दल भरली तरच बँक वाचू शकते हे सरकारने लक्षात घ्यावे…”
— भागवतराव सोनवणे
संयोजक, शेतकरी कर्जमुक्ती अभियान
15 ऑगस्ट ला 54 हजार कर्जदार शेतकरी येवल्यात:
— मोतीराम पाटील, जेष्ठ शेतकरी नेते, निफाड
राज्य सरकारमधील जेष्ठ मंत्री छगन भुजबळ हेच आता शेतकऱ्यांना व्याजमुक्ती मिळवून देतील,
त्यासाठी केंद्र आणि राज्य यांचे अनुदान आणि थकहमी देऊन लिलावग्रस्त जमिनी वाचवतील अशी धारणा आता शेतकऱ्यांची झाली आहे.
कर्जमुक्ती अभियानाचा केंद्रबिंदू मंत्री भुजबळ यांचा मतदारसंघ असेल, येवल्यात हलवले जाईल
आणि आणखी तीव्र लढा दिला जाईल, असे यावेळी बोलताना निफाड तालुक्यातील शेतकरी नेते मोतीराम पाटील यांनी सांगितले.
कर्जदार शेतकऱ्यांची स्थिती गंभीर
थकीत मुद्दल: ₹901.79 कोटी
माफ केले जाणारे व्याज: ₹620.11 कोटी
शिल्लक व्याज मागणी: ₹679 कोटी
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
1. शून्य टक्के व्याज योजना तातडीने जाहीर करावी
2. 10 सुलभ हप्त्यांत मुद्दल परतफेड योजना लागू करावी
3. बँकेकडून सुरू असलेली जमीन लिलाव/जप्तीची प्रक्रिया थांबवावी
चौकशीसाठी एखादी समिती नेमा :भुजबळ
शेतकऱ्यांच्या कर्ज माफी साठी तुम्ही शेतकऱ्यांच्या समित्या नेमतात, कधी तरी एखादी समिती नेमून आजवरच्या जिल्हा बँक अध्यक्ष, संचालक मंडळ यांनी आजवर कसे काम केले, बँकेचे कसे आर्थिक नुकसान झाले यावर ही समिती नेमा आणि बँकेत आजवर झालेली अनियमितता, गैरप्रकार कसा झाला याचा शोध घेण्यासाठी देखील समिती नेमा… अडचणीत आल्यावर शेतकरी गाऱ्हाने माझ्याकडे घेऊन येता, पण नाशिक जिल्हा बँक ही पुणे जिल्हा बँके राज्यातील क्रमांक 2 ची बँक होती आज बँकेच्या दुरावस्थेला जबाबदार कोण? तुम्ही जे संचालक निवडून देतात त्यावेळी नेमका कोणता विचार करता असा प्रश्न मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकरी शिष्टमंडळास केला.
यावर राज्याच्या सहकार खात्याने 2 वेळा लेखा परिक्षण केले, चौकशी अहवाल बनले पण सहकार खात्याने त्या अहवालावर स्थगिती आणली, असे शेतकरी संघटनेचे राज्य समनव्यक भगवान बोराडे यांनी सांगितले.



