कणकोरी सह पाचगाव पाणीपुरवठा योजना पाच दिवसांपासून ठप्प नांदूर शिंगोटे चास रस्त्याच्या कामामुळे पाईपलाईन फुटल्याने सदरच्या कामावरील ठेकेदाराच्या मनमाणीमुळे नांदूरकर पाण्यापासून वंचित दोन दिवसात पाईपलाईन दुरुस्ती न केल्यास नांदूर शिंगोटे ग्रामपंचायत प्रशासन सरपंच उपसरपंच व सदस्यांच्या वतीने आंदोलनाचा इशारा
कणकोरी सह पाचगाव पाणीपुरवठा योजना पाच दिवसांपासून ठप्प
नांदूर शिंगोटे चास रस्त्याच्या कामामुळे पाईपलाईन फुटल्याने सदरच्या कामावरील ठेकेदाराच्या मनमाणीमुळे नांदूरकर पाण्यापासून वंचित
दोन दिवसात पाईपलाईन दुरुस्ती न केल्यास नांदूर शिंगोटे ग्रामपंचायत प्रशासन सरपंच उपसरपंच व सदस्यांच्या वतीने आंदोलनाचा इशारा
नांदूर शिंगोटे वार्ताहर
कणकोरीसह पाचगाव पाणीपुरवठा योजना ही भोजापुर धरणांमधून सदरच्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी कार्यानित केलेली असून सदरची योजना आजपर्यंत अनेक विविध कारणांमुळे गाजलेली असतानाच सध्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा असतानाही गेल्या पाच दिवसापासून नांदुर-शिंगोटे सह परिसरातील लोकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

नांदूर शिंगोटे ते चास रस्त्याचे काम सध्या मोठ्या जोरात सुरू असून चासखिंड या ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे फिल्टर टाकी पासून नांदूर गावाकडे जो पाणीपुरवठा केला जातो ती पाईपलाईन सदरच्या कामामुळे फुटलेली असताना व कमीत कमी पाचशे फूट इतकी लाईन रस्त्यामध्ये दाबल्यामुळे सदरची लाईन चोकअप झाली असून ती लाईन दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्याचे काम हे सास रस्त्याचे ठेकेदार पटेल यांची जबाबदारी असतानाही ते अंग झटकत असून आमच्याकडे सदरच्या पाण्याच्या लाईन साठी कुठल्याही प्रकारचा निधी नसल्यामुळे ते काम आम्ही करू शकत नाही असे उत्तर देऊन सदरच्या ठेकेदाराने अंग झटकत असून सदरचे काम हे मोठे असून हे करण्याची जबाबदारी सुद्धा त्या सदरच्या ठेकेदाराच्या असताना तोही काम करत नाही कारण रस्त्याचे काम असल्यामुळे सदरची लाईन फुटली असून त्यामध्ये ती दाबली गेलेली आहे ती त्वरित सदरच्या ठेकेदाराने शिफ्ट करून देणे त्याचे काम असूनही तो उडवा उडवीची उत्तरे देत असून सदरचे काम त्वरित करण्यात यावे.
भविष्यामध्ये सदरचा नांदूर चास हा रस्ता एकदा कॉंक्रिटीकरण झाल्यास त्या रस्त्याखाली ही जी लाईन आहे ती कायमस्वरूपी दाबल्या जाईल व भविष्यामध्ये सदरची लाईन फुटणे चोकअप होणे लिकेज होणे हे प्रमाण वाढत राहिल्यास सदरची दुरुस्ती करणे खूप अवघड होईल म्हणून सदरची लाईन ही त्या रस्त्यामधून न टाकता दुसऱ्या बाजूने शिफ्ट करून देण्यात यावी अशी मागणी नांदूर शिंगोटे ग्रामपंचायत प्रशासनाचे सरपंच उपसरपंच व सदस्यांनी करूनही गेल्या पाच दिवसापासून या ठेकेदाराने कुठल्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे संपूर्ण नांदुर-शिंगोटे करांना पिण्याच्या पाण्या वाचून वंचित राहावे लागत आहे सदरची लाईन त्वरित दुरुस्त करून देण्यात यावी ही मागणी नांदूर शिंगोटे ग्रामपंचायत प्रशासनाने केली आहे.
प्रतिक्रिया

कणकोरीसह पाचगाव पाणीपुरवठ्याची लाहीन त्वरित दुसऱ्या बाजूने शिफ्ट करून द्यावी व फुटलेली लाईन दुरुस्त करून द्यावी यासाठी सदरच्या ठेकेदाराबरोबर वेळोवेळी बोलणे होऊ नये तो अंग झटकत आहे दोन दिवसांमध्ये सदरची लाईन त्वरित दुरुस्त न करून दिल्यास संपूर्ण ग्रामपंचायत प्रशासनाला सोबत घेऊन तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा नांदूर शिंगोटे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ शोभा दीपक बरके यांनी दिला आहे.



