सरपंच सेवासंघाचा आदर्श सरपंच पुरस्कार उपक्रम प्रेरणादायी..भास्करराव पेरे सिन्नरचे दत्ता गोसावी समाजभूषण सन्मान पुरस्काराने सन्मानित…
सरपंच सेवासंघाचा आदर्श सरपंच पुरस्कार उपक्रम प्रेरणादायी..भास्करराव पेरे
सिन्नरचे दत्ता गोसावी समाजभूषण सन्मान पुरस्काराने सन्मानित…
सिन्नर (प्रतिनिधी)
समाजात अनेकजण आपल्या कर्तुत्वाने सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करतात,त्यांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे. सरपंच सेवासंघ,महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार उपक्रम प्रेरणादायी तसेच इतरांना ऊर्जा देणारा आहे असे गौरवोद्गार आदर्श सरपंच भास्करराव पेरे यांनी अहिल्या नगर येथे माऊली संकुल सभागृह येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सरपंच संघटित चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे यांच्या नेतृत्वात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी व्यासपीठावर बाबासाहेब पावसे, रोहीत पवार,हभप जयश्रीताई तिकांडे,रवी पावसे,अमोल शेवाळे,बाबाजी गुळवे,सुजाता कासार,यादव पावसे,राजेंद्र गिरी उपस्थित होते.सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी सामाजिक तसेच विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दाखल घेऊन सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने” समाजभूषण सन्मान२०२५ ” पुरस्काराने भास्करराव पेरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र,सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्यामसुंदर झळके,दत्ता जोशी,राजेंद्र गोसावी,भाऊसाहेब ढेंगळे आदी उपस्थित होते.