सिन्नर विधानसभा उमेदवारीसाठी पक्षनिष्ठ विचारसरणीला प्राधान्य देण्यात यावे- सिन्नर तालुका कार्याध्यक्ष जयराम शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट व्यक्ती केंद्रित सिन्नरच्या राजकारणात आयाराम उमेदवार जाहीर करताना राष्ट्रवादीच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी
सिन्नर विधानसभा उमेदवारीसाठी पक्षनिष्ठ विचारसरणीला प्राधान्य देण्यात यावे- सिन्नर तालुका कार्याध्यक्ष जयराम शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट
व्यक्ती केंद्रित सिन्नरच्या राजकारणात आयाराम उमेदवार जाहीर करताना राष्ट्रवादीच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी
सिन्नर प्रतिनिधी –
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने पक्षनिष्ठ विचारसरणीला अनुसरून काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्याला विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी प्राधान्य देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष जयराम शिंदे यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले त्यात त्यांनी ही मागणी केली आहे.
पक्षाच्या ध्येय धोरणावर , नेतृत्वावर विश्वास ठेऊन कार्यकर्ते तालुक्यात तळागाळात काम करत असतात. तालुक्यात हजारो कार्यकर्ते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांना मानणारे आहेत. सिन्नरची महाविकास आघाडीची विधानसभेसाठीची जागा ही राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आहे.
परंतु सिन्नर तालुक्यात व्यक्ती केंद्रित राजकारणाला महत्व दिले जाते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आयात उमेदवाराला प्राधान्य देण्याची परंपरा सिन्नर तालुक्यात आहे. परंपरे नुसार जर पक्षाने आयात उमेदवार देताना सिन्नर तालुका कार्यकारणी, तसेच कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर केली तर विधानसभा निवडणूक प्रक्रियेवर सिन्नर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष बहिष्कार टाकणार असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.