*गावात कुणी नागरिकांनी व्यसन केले तर महिलांकडून मिळणार चोप..?* *धोंडाळपाडा ग्रामपंचायतचा अनोखा ठराव समत..!*
*गावात कुणी नागरिकांनी व्यसन केले तर
महिलांकडून मिळणार चोप..?*
*धोंडाळपाडा ग्रामपंचायतचा अनोखा ठराव समत..!*
दिंडोरी प्रतिनिधी –
गावात तरूण वर्ग व नागरिक व्यसनाधिन होत असल्याची बाब लक्षात घेता. धोंडाळपाडा येथील ग्रामपंचायतीने व्यसन करून कुणी गावात दिसला तर महिला कडून चोप देण्यात येईल, असा अनोखा ठराव ग्रामसभेत संमत करण्यात आला आहे.
दिंडोरी तालुक्यातील पश्चिम दुर्गम भागातील धोंडाळपाडा ग्रामपंचायतीची महिला ग्रामसभा सरपंच लता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.
यावेळी महिला ग्रामसभेत वाढती व्यसनाधिनता लक्षात घेता सविस्तर चर्चा करून गावांची परीस्थिती बघता तरुण, शाळकरी मुले व इतर पुरुष वाममार्गाचा अवलंब करीत आहेत.मद्यपान ,चरस, गांजा आणि इतर व्यसनाधीन पदार्थांचे सेवन करीत आहेत.यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहे.
तसेच शाळकरी मुले अफु, गांजा,चरस, याचे सेवन करुन जेष्ठ नागरिक ,आई, वडील,भाऊ, गावातील ग्रामस्थांची
नशा करून मर्यादेचे उल्लंघन करीत आहेत.लग्न समारंभ, गणपती उत्सव, हरिनाम सप्ताह, होळी , दिवाळीअसे परंपरागत चालत आलेल्या सणामध्ये व कार्यक्रमांनमध्ये मद्यपान सेवन करुन कुटुंबाला, गावाला त्रास देतात.विडी, सिगारेट ,सुरा,अफु, गांजा सेवन केलेल्या मुलांना विवाहासाठी स्थळ मिळत नाही. या बाबींचा विचार विनिमय करून भविष्यात गावगाडा सुरळीत चालावा यासाठी महीला कमेटी स्थापन करण्यात आली.जे युवक व्यसनाधीन होऊन कुटुंबाला, गावाला त्रास देतील त्यांना महिला कमिटीत असलेल्या महीला अशा व्यसनाधीनांना चोप देऊन कायद्याने नियमानुसार पोलिसांच्या ताब्यात देऊन, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.असा ठराव सर्वोमते करण्यात आला आहे.
*महिला कमेटी*
अध्यक्षा-कविता गहिले,उपाध्यक्ष भारती पाडवी ,सचिव-चंद्रकला हिंडे,पोलिस पाटिल,
भारती हिंडे,सरपंच लता गायकवाड,
सदस-सावित्रा हिंडे ,उषा हिंडे,कांता गहिले, अनुसया हिंडे ,जना गहिले, हिरा हिंडे,सरु गायकवाड, अनुसया वाघमारे,मंजुळा गहिले,शांता वाघमारे, यशोदा पवार, लता हाडस,मालती गहिले,यमुना गहिले, जना वाघमारे, लक्ष्मी गहिले आदीचा समावेश आहे.