पंडीत कॉलनीतील खून प्रकरणात दोन संशयित ताब्यात ; गुन्हेशाखा युनिट एकने नऊ तासात बांधल्या मुसक्या
पंडीत कॉलनीतील खून प्रकरणात दोन संशयित ताब्यात ;
गुन्हेशाखा युनिट एकने नऊ तासात बांधल्या मुसक्या
नाशिक प्रतिनिधी
अचानक होणारे हल्ले, खून रोखणे पोलिस यंत्रणेच्या हातात नसले तरी हल्लेखोरांच्या मुसक्या बांधण्यासाठी तत्परता दाखवणे मात्र पोलिसांच्या हातात आहे. प्रामाणिक इच्छाशक्ती असेल तर असे गुन्हेगार शोधून काढणे पोलिस यंत्रणेला अवघड नाही. हेच शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दाखवून दिले आहे.
एक ऑकटोबरच्या भल्या सकाळी गंगापूर रोड वरील मॅरेथॉन चौकात आकाश धनवटे या युवकावर काही तरुणांनी हल्ला केल्याची बातमी शहरभर पसरल्याने दहशतयुक्त खळबळ उडाली होती. भल्या सकाळी भर चौकात हा हल्ला झाला असल्याने पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले होते.सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिनं २४५/२०२४ भा. न्या. सं. कलम १०९ (१), ६१ (२), ३५१ (२), ३५१ (३).३ (५), भा.ह. का कलम ४/२५, म.पो.का कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी तपास सुरुही केला होता.
हा हल्ला शहराच्या मध्यवर्ती भागात झाला असल्याने तो त्वरीत उघडकीस यावा यासाठी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, यांनी गुन्हे शाखेचे पो. उपायुक्त प्रशांत बच्छाव,सहा. पोलिस आयुक्त संदिप मिटके, यांना तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या.त्यानंतर त्यांनी गुन्हे शाखा युनिट एकचे वपोनि मधुकर कड, त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी भेट देवुन समांतर तपास सुरु केला.
तपासा दरम्यान पोहवा विशाल काठे व संदिप भांड यांना मिळालेल्या गोपनीय बातमी वरून सदर गुन्हयातील संशयित आरोपी अथर्व दाते, अभय तुरे व रितेश साळुंखे हे पेठ भागात गेले असल्याची माहीती मिळाली, त्यानुसार वपोनि मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ चे सपोनि हेमंत तोडकर, पोउनि रविंद्र बागुल, पोहवा विशाल काठे, संदिप भांड, प्रशांत मरकड, विशाल देवरे या पथकाने पेठ परिसरात जावुन या संशयित आरोपीतांचा शोध घेतला असता,अथर्व अजय दाते, वय-२० वर्षे, रा-घारपुरे घाट अशोकस्तंभ नाशिक, अभय विजय तुरे, वय १९ वर्षे, रा हेमलता टॉकीज रविवार पेठ नाशिक, व बालक यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्या संशयितांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीतांना पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
यातील आरोपी अथर्व अजय दाते हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरोधात १) सरकारवाडा पो. स्टे । गुरनं १७०/२०२१ भा.द.वि कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे २) सरकारवाडा पो. स्टे । गुरनं ३२१/२०२३ भा.द.वि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे ३) पंचवटी पो. स्टे । गुरनं ३०१/२०२४ भा.द.वि कलम ३२६,४५२, ५०४, ३४ प्रमाणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त संदिप मिटके, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि रविंद्र बागुल, पोहवा विशाल काठे, संदिप भांड, प्रशांत मरकड, विशाल देवरे, शरद सोनवणे, जगेश्वर बोरसे, प्रदिप म्हसदे, रविंद्र आढाव, नाझीम पठाण, धनंजय शिंन्दे, महेश साळुंके, योगीराज गायकवाड, नितीन जगताप, विलास वारोस्कर, रमेश कोळी, राजेश लोखंडे, समाधान पवार, मनिषा सरोदे यांनी केली.