क्राईम

या प्रमादाला दंडीत कुणी करायचे? जिल्हा शल्य चिकत्सक गुळणी धरून का बसतात??


या प्रमादाला दंडीत कुणी करायचे?

जिल्हा शल्य चिकत्सक गुळणी धरून का बसतात??
नाशिक प्रतिनिधी

 नाशिक जिल्हा रुग्णालयातील वर्ग एकचे अधिकारी डॉक्टर प्रमोद चौधरी हे प्रायव्हेट प्रॅक्टिस करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अनिल भडांगे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना केली आहे.

या विषयाला अनुसरून अनिल भडांगे यांनी जिल्हा शल्य चिकित्साकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
नाशिक जिल्हा रुग्णालयातील प्रस्तुती कक्षाचे वर्ग एकचे  अधिकारी डॉ. प्रमोद चौधरी हे  जिल्हा रुग्णालयामध्ये शासकीय सेवा बजावत असताना त्यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट प्रक्टिस करत असल्याचे  निदर्शनास आले आहे. दि. 2 डिसेंबर 2024 रोजी एका प्रादेशिक वृत्त वाहिनीवर  डॉ. चौधरी यांनी पेशंट संबंधित दिलेल्या मुलाखतीमध्ये डॉ चौधरी है त्यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये जिल्हा रुग्णालयातील ड्युटीच्या वेळेत ड्युटी सोडून त्याच्या वेद मंदिर शेजारील चौधरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पेशंटची प्रस्तुती करताना आढळून आले आहेत . हे या मुलाखतीमधून सि‌द्ध होत आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार शासकीय सेवेत काम करणाऱ्या डॉक्टरांना खाजगी प्रैक्टिस करू नये, म्हणून पगारा व्यतिरिक्त 35% अतिरिक्त भता दिला जातो. व डॉक्टरांकडून दर महिन्याला  प्रायव्हेट प्रेक्टिस करणार नाही याबाबतचे प्रमाणपत्र भरून घेतले जाते. तरी पण जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर  शासनांच्या डोळ्यात धुळफेक करून व शासनाचा 35% अतिरिक्त भत्ता पेऊन जिल्हा जिल्हा रुग्णालयात त्यांचे कर्तव्य बजावण्याचे सोडून त्यांच्या खाजगी रुग्णालयामध्ये प्रायव्हेट पॅक्टिस करत असल्याचे  दिसून येत आहे.

Advertisement

जिल्हा रुग्णालयामध्ये आदिवासी भागातील संपूर्ण नाशिक जिल्यातून प्रसूतीसाठी महिला रुग्ण दाखल होत असतात.परंतु त्यांच्यावर  उपचार करणारे  जिल्हा रुग्णालयात पेशंट न तपासता खाजगी दवाखान्यात प्रायव्हेट पॅक्टिस करत लाखोंची  माया जमा करत आहेत व शासनाची फसवणूक करत आहेत . जिल्हा रुग्णालयातील गरीब रुग्णांवर उपचार केले जात नसल्याने बालक दगावण्याचे प्रमाण वाढलेले आहे. सदरहू डॉ. प्रमोद चौधरी है दिवसभर त्यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये बसून असतात व जिल्हा रुग्णालयातील शिकावू  डॉक्टरांच्या हवाली सर्व कारभार सोपवून देतात. पाहिजे तशी सुविधा मिळत नसल्याने आपण त्वरित डॉक्टर चौधरी यांची 2 तारखेला दिलेल्या मुलाखती संबंधात व त्यांच्या खाजगी दवाखान्याबाबत त्वरित चौकशी करून शासनाची  फसवणूक करणाऱ्या, प्रायव्हेट प्रक्टिस करणाऱ्या डॉ. प्रमोद चौधरी यांचा अतिरिक्त भत्ता बंद करण्यात यावा व त्यांनी आतापर्यंत घेतलेला भता त्यांच्या पगारातून वसूल करण्यात यावा. सदर डॉक्टर प्रमोद चौधरी यांच्यावर तात्काळ कारवाई न केल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आपल्या दालनात या आंदोलन करण्यात येईल.असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

 :-जिल्हा शल्य चिकित्सक गुळणी धरून का बसतात?
जिल्हा शासकीय रुग्णालयात अध्यापही बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून शासकीय सवलती मिळवणे, त्या बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे आरोग्य सेवेत रुजू होण्याचे प्रकार सुरूच असून गेल्या काही दिवसात मिळालेल्या माहिती नुसार कर्णबधिर अशोक वसंत निचळ_वर्ग चार उपसंचालक कार्यालय नाशिक
अस्थिव्यंग नितीन रामचंद्र तिवडे_वर्ग चार जिल्हा रुग्णालय नाशिक
कर्णबधिर गुलबीर सिंग किरण सिंग चितोळे_वर्ग चार जिल्हा रुग्णालय नाशिक
अस्थिव्यंग निलेश जालिंदर निकम_वर्ग चार जिल्हा रुग्णालय नाशिक
संजय सहादु शिंदे_वर्ग 3 दोडी ग्रामीण रुग्णालय सिन्नर
उल्हास पैठण पगार_वर्ग चार जिल्हा रुग्णालय नाशिक
 सुनील शेजवळ_वर्ग चार जिल्हा रुग्णालय नाशिक अशी काही नावे निष्पन्न झाली आहेत. या कर्मचाऱ्यांनी अद्याप पावेतो यु डी आयडी मिळवले नसल्याचीही खात्रीशीर माहिती आहे. या संदर्भात जिल्हा शासकीय रुग्णालयाचे प्रशासन काय कारवाई करणार की अन्य प्रकरणाप्रमाणे या प्रकरणातही शासकीय गुन्हेगारांना पाठीशी घालणार हा खरा सवाल आहे. या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाने देखील तक्रार केल्याची माहिती मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *