श्री नेमिनाथ जैन विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात कलागुणांची उधळण श्री नेमिनाथ जैन विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात पारंपारिक आखाडी नृत्याचे सादरीकरण
श्री नेमिनाथ जैन विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात कलागुणांची उधळण
श्री नेमिनाथ जैन विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात पारंपारिक आखाडी नृत्याचे सादरीकरण
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
…………………………………………………………………………….
धनंजय पाटील / चांदवड
श्री नेमिनाथ जैन विद्यालयाच्या विद्यार्थांनी विविध कलाविष्कार आणि खिलाडू वृत्तीचे सादरीकरण करत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाल्या बाबतची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
दि. 23 ते 28 डिसेंबर 2024 या कालावधीत श्री नेमिनाथ जैन विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या वार्षिक स्नेहसंमेलनात कैलास कडलग प्रांताधिकारी चांदवड तहसील कार्यालय चांदवड, रामचंद्र बोडके गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती चांदवड, वसंतराव खैरनार विस्ताराधिकारी (शिक्षण) पंचायत समिती चांदवड, रविंद्र आबड विश्वस्त समिती सदस्य, पिंटूभाऊ संचेती विश्वस्त समिती सदस्य श्री नेमिनाथ जैन संस्था, राजू भाऊ शेलार माजी उपनगराध्यक्ष चांदवड नगरपरिषद, सिद्धेश्वर आखेगावकर पोलीस उपनिरीक्षक चांदवड पोलीस स्टेशन चांदवड, अमोल जाधव गुप्तचर विभाग चांदवड पोलीस स्टेशन चांदवड, अशोक काका व्यवहारे राष्ट्रपती पुरस्कार विजेते व ज्येष्ठ व्यक्तिमत्व, आत्माराम कुंभार्डे माजी जि.प.सदस्य, शंभूराजे खैरे शिवसेना नेते, महेश गुजराथी पत्रकार दैनिक लोकमत, सुनील आण्णा सोनवणे पत्रकार सद्गुरु रक्षा न्यूज, नितीन फंगाळ पत्रकार दैनिक आपले महानगर, कैलास सोनवणे पत्रकार दैनिक गांवकरी, देविदास जाधव पत्रकार दैनिक जागर जनस्थान, धनंजय पाटील पत्रकार दैनिक आपली दुनियादारी, आशिष झिलपे शाखाधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र चांदवड, उमेश गरुड बँक ऑफ महाराष्ट्र चांदवड, राहुल आचालिया, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शाळा व्यवस्थापन व विकास समिती सदस्य, शिक्षक पालक संघ सदस्य, माता पालक संघ सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याला वार्षिक स्नेहसंमेलनात विविध क्रीडा स्पर्धा, वैयक्तिक स्पर्धा, तसेच समूह गायन, समूहनृत्य, वाद्य वादन, नाटिका, शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शन, शब्दफुले या हस्तलिखिताचे प्रकाशन, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा इ. कलाविष्कारांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.
चांदवड गावाचे पारंपारिक आखाडी नृत्य या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आकर्षण ठरले.
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान समजावे या उद्देशाने विद्यार्थ्यांनी स्वतः बनवून आणलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीचे स्टॉल मांडून आनंद मेळाव्याचे तसेच गंमतीदार खेळांचे देखील स्नेहसंमेलनात आयोजन करण्यात आले होते.
शालेय जीवनात वार्षिक स्नेहसंमेलन ही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी उल्लेखनीय घटना असते. विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपला आनंद द्विगुणीत करावा आणि खेळाडू वृत्तीचे प्रदर्शन करावे अश्या शब्दात प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आत्माराम कुंभार्डे, पिंटुभाऊ संचेती, महेश गुजराथी, आशिष झिलपे आदि मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या वार्षिक स्नेहसंमेलनाचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख यांनी मनःपूर्वक कौतुक केले.
विद्यालयाच्या या स्नेहसंमेलनाप्रसंगी विद्यालयाचे उपप्राचार्य देवेंद्रराज जैन, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील, क्रीडा विभाग प्रमुख दत्ता ठाकरे, स्नेहसंमेलन प्रमुख सुनिल रकिबे, ज्येष्ठ शिक्षिका दुर्गा शाकद्वीपी, ज्येष्ठ शिक्षक शिक्षक सुनिल बुरड यांच्यासह विद्यालयातील सर्वच शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले.