सावत्र बापाने केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार मानेवर खुरपे ठेऊन धमकी,आरोपीस अटक.
सावत्र बापाने केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
मानेवर खुरपे ठेऊन धमकी,आरोपीस अटक.
ओझर प्रतिनिधी
येथून जवळ असलेल्या दात्याने शिवारात सावत्र बापाने, आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिला जिवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित मुलीने आपल्या आईला सोबत घेऊन,ओझर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर, गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटना दात्याणे शिवारात असलेल्या एका उसाच्या शेतात घडली. दत्तू कुंडलिक वाघ हा पीडितेचा सावत्र वडील असून, मंगळवारी दुपारी त्याने अल्पवयीन पिडीतेस बकऱ्यांना चारा आणायला चल,असे सांगत सोबत नेत पिडीतेसोबत बळजबरी करत, जवळील द्राक्षबागेत तिच्या अंगावरील वस्त्र काढण्यास सांगितले.त्याच क्षणी पिडीतेने आरडाओरडा केल्यावर दत्तू वाघ याने तिला गालात मारहाण करत ऊसाच्या शेतात ओढून नेत,खाली पाडत विवस्त्र करत, हातातील खुरपे गळ्यावर ठेवत,तू ओरडलीस तर तुला जीवे ठार मारून विहिरीत फेकून देईल,अशी धमकी देत दारूच्या नशेत असलेल्या दत्तू वाघने तिच्या शरीरावर अत्याचार केले.या गंभीर घटनेची दखल घेत, पीडित आणि आईने ओझर पोलीस ठाण्यात धाव घेत झालेला प्रकार सांगितला.ओझर पोलिसांनी तत्काळ दत्तू कुंडलिक वाघ रा. समता नगर,आगर टाकळी नाशिक यास बुधवारी पहाटे अटक करत गुन्हा दाखल केला. पुढील तपास ओझर पोलीस करत आहेत.