शिक्षिकेनेच सुपारी देऊन केला प्रियकराचा खून ; अवघ्या ५ तासाच्या आत पंचवटी पोलिस आणि युनिट एकने बांधल्या संशयितांच्या मुसक्या
शिक्षिकेनेच सुपारी देऊन केला प्रियकराचा खून ;
अवघ्या ५ तासाच्या आत पंचवटी पोलिस आणि युनिट एकने बांधल्या संशयितांच्या मुसक्या
नाशिक प्रतिनिधी
भारत वर्षात सर्व दूर महिलांवर होणारे अत्याचार थांबावेत, नराधम पुरुषी प्रवृत्ती ठेचावी,महिला सुरक्षेसाठी रान पेटले असताना नाशिकमध्ये मात्र विपरीत घटना घडली. या घटनेकडे मर्डर मिस्त्री, अत्याचाराने हतबल झालेल्या महिलेने घेतलेला बदला, अविवेकाने केलेल्या कृत्याचा परिणाम अशा विविध अंगाने पाहिले जात आहे.
या संवेदनशील घटनेचा वृत्तांत असा की, नाशिक शहरातील रात्र शाळेत भूगोल शिकविणाऱ्या कंत्राटी शिक्षिका भावना कदम या उच्च शिक्षित महिलेचा प्रियकर गगन कोकाटे या पोलिस पुत्राचा चक्क दोन लाखांची सुपारी देऊन खून केल्याची घटना पंचवटी पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने उघडकीस आणली आहे. रात्री साधारण ९. ३० वाजेच्या दरम्यान झालेल्या या खुनाची वार्ता सकाळी समजल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तपास सुरु केला. गगनच्या खिशात सापडलेल्या चिट्ठीवरून संशयित भावना कदम या महिलेला ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केली असता, सन 2०20 पासून सातपूर अशोक नगर भागात राहणाऱ्या गगन कोकाटे या युवकाशी तिचे प्रेमसंबंध होते. तथापी काही दिवसापूर्वी भावनाने त्याच्यापासून अंतर ठेवण्याससुरुवात केली. त्यानंतर देखील गगन महिलेच्या वारंवार संपर्कात राहून तिला त्रास देत असल्याचे तिचे म्हणणे आहे. त्रास खूपच वाढल्याने त्याला कायमचा संपविण्याचा निर्धार करून तीने चार पाच महिन्यापूर्वी संपर्कात आलेला,अशोक नगरमध्येच राहणारा संकेत शशिकांत रणदिवे याच्याशी संगनमत करून, त्याला दोन लाख रुपये देण्याचे कबूल करून, गगनचा खून करण्यास सांगीतले. संकेतने,मेहफूज रशिद सैयद, रितेश दिलीप सपकाळे,गौतम सुनिल दुसाने,आणि दोन विधिसंघर्षित बालक यांना सोबत घेऊन गगनचा खून केला.अशी कबुली भावना कदमसह अन्य संशयितांनी दिल्याने त्यांच्याविरुद्ध भा. न्या. सं. १०३(१) या सह कट कारस्थान करणे याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे संदीप मिटके, सहाय्यक पो. आयुक्त पद्मजा बढे, यांच्या मार्गदर्शनात पंचवटी आणि युनिट एकचे वपोनि मधुकर कड यांनी तपास कामी तयार केलेल्या पाच पथकातील पो उ नि श्रीवंत, पोउनि गजानन इंगळे, बागुल, पोहवा प्रविण वाघमारे, पोहवा. विशाल काठे, पोहवा नाझीमखान पठाण, पोहवा प्रशांत मरकड, पोहवा देविदास ठाकरे, पोहवा महेश साळुंके, पोहवा प्रदिप म्हसवे, पोहवा शरद सोनवणे, पोहवा धनंजय शिंदे, पोहवा योगीराज गायकवाड, पोहवा रमेश कोळी, पोहवा राजेश लोखंडे, पोना विशाल देवरे, पोना मिलिंदसिंग परदेशी, पोअं विलास चारोस्कर, पोअं नितीन जगताप, पोअं आप्पा पानवळ, पोअं मुक्तार शेख, पोअं राम बर्डे, पोअं अमोल कोष्टी, पोअं जगेश्वर बोरसे, पोअं समाधान पवार, मपोअं अनुजा येवले , चासपोउनि किरण शिरसाठ, युकाम पवार तसेच पंचवटी पोलीस ठाण्याचे सपोउनि संपत जाधव, पोहवा कैलास शिंदे, पोहवा महेश नांदुर्डीकर, पोहवा सागर कुलकर्णी , मपोअं रोहिणी भोईर या वेगवेगळ्या पथकाने या गुन्ह्याचा उलगडा करुन संशयितांना ताब्यात घेतले.साडेसहा वाजता घटना समजली. सकाळी १०. ३१ वा गुन्हा दाखल केला आणि त्यानंतरच्या अवघ्या पाच तासात सर्व संशयित ताब्यात घेऊन तपास केल्याने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या पथकाचे विशेष कौतुक केले आहे.