थकीत वेतन, वेतन आयोगाचा फरक अदा करण्यासाठी दोन लाखांची लाच शिक्षण अधीक्षक महिलेला रंगेहाथ अटक, शिक्षक पती पत्नीची तक्रार
थकीत वेतन, वेतन आयोगाचा फरक अदा करण्यासाठी दोन लाखांची लाच
शिक्षण अधीक्षक महिलेला रंगेहाथ अटक, शिक्षक पती पत्नीची तक्रार
नाशिक प्रतिनिधी
मिनाक्षी भाऊराव गिरी, अधिक्षका, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद धुळे तथा अधिक्षका (माध्यमिक) वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय, धुळे यांनी तक्रारदार यांचेकडुन २,००,०००/-रु लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आल्याने त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
तकारदार व त्यांची पत्नी, महानगरपालिका हायस्कुल, धुळे येथे विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. ३०.११.२०२३ च्या शासन निर्णयान्वये त्यांचे एप्रिल २०२२ ते ऑक्टोंबर २०२३ या कालावधीतील थकीत वेतन तसेच ७ व्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता मंजुर होवुन शिक्षण संचालक, पुणे यांनी सदरचे थकीत वेतन अधिक्षक (माध्यमिक), वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय, धुळे यांच्या खात्यात जमा केले होते. परंतु सदरचे थकीत वेतन तक्रारदार व त्यांच्या पत्नीस अदा न झाल्याने त्यांनी वेळोवेळी मिनाक्षी गिरी, अधिक्षका (माध्यमिक), वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय, धुळे यांची त्यांच्या कार्यालयात जावुन भेट घेतली होती. परंतु त्यांनी या ना त्या कारणाने तक्रारदार व त्यांच्या पत्नीस, त्यांचे थकीत वेतन अदा केले नाही. त्यांनतर सुमारे १५ ते २० दिवसापुर्वी तक्रारदार यांनी श्रीमती मिनाक्षी गिरी, अधिक्षीका यांची त्यांचे कार्यालयात जावुन त्यांना सदरचे थकीत वेतन अदा करणे बाबत विनंती केली असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे २,००,०००/-रू लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, धुळे येथे आज दि. २०.०८.२०२४ रोजी समक्ष येवुन तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची आज रोजी पडताळणी केली असता, पडताळणी दरम्यान अधिक्षीका श्रीमती मिनाक्षी गिरी यांनी तक्रारदार यांचेकडे २,००,०००/- रु लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केल्याने, आज रोजी त्यांचेवर सापळा लावला असता सापळा कारवाई दरम्यान सदर लाचेची रक्कम कार्यालयात स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन, त्यांचे विरुध्द धुळे शहर पो. स्टे. जि. धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, प्रविण मोरे, मकरंद पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.
सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपुत यांचे मार्गदर्शन लाभले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.