क्राईम

विश्रामगडावर छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटीतर्फे साजरी होणार शिव जयंती; जनसेवा सेवाभावी संस्थेवर मोठी जबाबदारी 


विश्रामगडावर छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटीतर्फे साजरी होणार शिव जयंती;

 

जनसेवा सेवाभावी संस्थेवर मोठी जबाबदारी 

☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️

         मराठी संस्कृती जतन करा 

 

………………………………………………………………………….

सिन्नर प्रतिनिधी

अकोला नाशिक सरहद्दीवर असलेल्या विश्रामगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटी, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणगाव जनसेवा सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून, विश्रामगडावर शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

माजी केंद्रीय मंत्री व श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटी नवी दिल्ली संस्थापक अध्यक्ष, विजय नवल पाटील, अध्यक्ष ओम देशमुख, सेक्रेटरी गंगाधर पोखरकर, समन्वयक राजेश चव्हाण, भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष जनसेवा सेवाभावी संस्थेचे, आधारस्तंभ मुकुंद काकड, भारतीय जनता पार्टी सरचिटणीस व जनसेवेचे संस्थापक अध्यक्ष रामदास भोर , कार्यक्रमासाठी उपस्थितीत विश्रामगड वन अधिकारी, सुनबाई डेंगळे, सरपंच विठ्ठल गोडे , वन्य व्यवस्थापक समिती अध्यक्ष गणपत गोंडे, उपसरपंच कुंडलिक गोंडे, उपाध्यक्ष वनी व्यवस्थापक समिती विश्रामगड जगन गोडे, हौशीराम गोडे, पोपट जाधव यांनी विश्रामगडावर संयुक्त दौरा करून पाहणी केली त्यावेळी हा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Advertisement

आदिवासी भागातील गरजू मुलांना मुलींना कॉम्प्युटर क्लासेस मोफत, शिवम क्लास महिलांना मोफत, सौर ऊर्जेचे लॅम्प, लकी ड्रॉ पद्धतीने देण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी सेंद्रिय खते, पर्यावरण पूरक पिशव्या, मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे, सर्व कार्यक्रमांसाठी आर्थिक मदत, श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटी नवी दिल्ली, उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटी नवी दिल्ली यांच्या तर्फे केला जाणार आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटी नवी दिल्ली यांच्या सदस्यांकडून जनसेवाचे संस्थापक अध्यक्ष रामदास भोर, व सरपंचाचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटी नवी दिल्ली समन्वयक राजेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करतांना गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना व नागरिकांसाठी,आदिवासी विभागांमध्ये नवनवीन उपक्रम जनसेवा सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न करून लोकांसाठी रोजगार निर्माण करून देऊ,असे आश्वासन दिले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *