*भैरवनाथ यात्रेत सिन्नर सांस्कृतिक मंडळाचा अनोखा कार्यक्रम*
*भैरवनाथ यात्रेत सिन्नर सांस्कृतिक मंडळाचा अनोखा कार्यक्रम*
सिन्नर प्रतिनिधी
ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या यात्रेत महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात .परंतु एवढ्या मोठ्याभाविकांच्या गर्दीमध्ये त्यांच्या चपला, बूट ,पादत्राणे यांची त्यांना सारखी चिंता सतावत असते .म्हणून भाविकांची ही समस्या दूर करण्यासाठी सिन्नर सांस्कृतिक मंडळ गेल्या 25 वर्षापासून चरण सेवा करून ग्रामदैवत भैरवनाथाची सेवा करत असते. मंडळाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, कार्याध्यक्ष प्रकाश नवसे, उपाध्यक्ष प्राध्यापक राजाराम मुंगसे ,सचिव प्राध्यापक जावेद शेख,भाऊशेठ जाधव दत्ता जोशी यांनी ऊत्स्फूर्त सहभाग घेऊन सास्कृतिक मंडळाचा हा सेवाभावी कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला. चरणसेवेसाठी प्राध्यापक अरुण पोटे, प्राध्यापक रामदास सोनवणे,प्रा.आर.बी.गायकवाड, डा.राजेंद्र आगवणे,प्रा. शिवाजी सुंभे,कुमारी स्नेहा सिंग ,आदित्य माळी, मनिष अहिरे, आर्यन वाघ ,वैष्णवी झगडे, पायल वारुंगसे , निलेश तेल्लोरे ,प्रज्वल ढमाले,भावेश बोरसे,कैलास गितेआदी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. तसेच यावर्षी 2024 मध्ये लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे. त्यामुळे मतदारांची जागृती होऊन लोकांनी योग्य उमेदवाराला निर्भयपणे मतदान करावे व आपल्या पसंतीचा उमेदवार निवडून द्यावा यासाठी प्रथम मतदानाचा हक्क बजावा यासाठी मतदारांची मतदानकरण्यासाठी जनजागृती देखील केली .प्रा़ जावेद शेख यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींचा संच घेऊन शाहिरी गीता द्वारे ,समूह गीता द्वारे पथनाट्य सादर करून मतदारांची जनजागृती केली. या कार्यक्रमाला भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून दाद दिली. सदर कार्यक्रमासाठी समाजसेवक नंदू शेठ मुत्रक तसेच वीरेंद्र परदेशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.