ताज्या घडामोडीराजकीय

बहुजन ऐक्याचे दर्शन वंचितच्या रॅलीतून शिर्डीत उत्कर्षा रुपवतेंचे शक्तिप्रदर्शन    


बहुजन ऐक्याचे दर्शन वंचितच्या रॅलीतून शिर्डीत उत्कर्षा रुपवतेंचे शक्तिप्रदर्शन    

रणरणत्या उन्हात जेष्ठ नागरिक,महिला,तरुणांचा पायी चालत रॅलीत उस्पुर्त सहभाग

हिवरगाव पावसा प्रतिनिधी 

वंचित बहुजन आघाडीचे शिर्डी लोकसभा उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला हा अर्ज दाखल करण्यासाठी उस्पुर्तपणे बहुजन समाजातील कार्यकर्ते,जेष्ठ नागरिक,महिला व तरुण मोठ्याप्रमाणात रॅलीत सहभागी झाले होते.यावेळी ऍड संघराज रुपवते,सुशीलाताई रुपवते,दत्ता ढगे पाटील,गोविंदराव कांदळकर,जालिंदर आखाडे,दिशा पिंकी शेख,अरुण जाधव,अजीजभाई वोहरा, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, युवक जिल्हा अध्यक्ष सचिन बनसोडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे विविध तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कोणतीही अपेक्षा न ठेवता कार्यकर्त्यांनी स्वत:ला झोकून देवून प्रभागातून, गावांतून 50% मतदान घडवून आणा व उत्कर्षाला मोठ्या मतांच्या फरकाने विजयी करा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी झालेल्या विराट सभेला मोबाईलद्वारे प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले.

Advertisement

यावेळी उत्कर्षाताई म्हणाल्या,मी तुमच्याचं घरातील लेक असून कालकथित दादासाहेब रुपवते , दिवंगत चौधरी यांचा सामाजिक,राजकिय वारसा घेवून मी गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे शिर्डी मतदारसंघातील बेरोजगारी,पाण्यासह विविध समास्या दूर करण्या ऐवजी आजी- माजी खासदार हे केवळ एकमेकांची धुंणे धूत असून त्यांना समाजाचे एकमात्र घेणे नाही.त्यांनी आता निवृत्ती घ्यावी आपली जबाबदारी वाढली असून कमी कालावधीत लोकांपर्यत पोहचायचे आहे तेव्हा तरुणांनी आपणचं उमेदवार समजून वाड्या- वस्त्यांवरील,गावातील व प्रभागातील लोकांना विनंती करून मतदान घडवून आणा.युती अथवा आघाडीचे लोक फक्त संविधाना बाबत गप्पा मारतात.मात्र संविधानाचे रक्षण हे आपल्यालाचं करायचे असून संविधान बदलण्याची कोणाची हिंमत नाही तर संविधान व शिर्डीच्या विकासाकरिता ही लढाई आहे तेव्हा तुमची मला महत्वांची साथ हवी असे भावनिक आवाहन उत्कर्षा रुपवते यांनी केले.

यावेळी संघराज रूपवते म्हणाले की, शिर्डी मतदार संघातील युती,आघाडी चे उमेदवार हे खऱ्या अर्थाने काळू – बाळूचं आहे.आता हे दोन्ही भाऊ नको तर आपलेला भिमाची वाघिण हवी , उत्कर्षासारखी सर्वंगुण संप्रन्न असणाऱ्या व्यक्तीमत्वाला संधी दया हे उगवते नेतृत्व आहे .

 

कामगार नेते दशरथ सावंत म्हणाले, जनता प्रस्थापितांना कंटाळल्याने पर्याय शोधत होते मात्र उत्कर्षा रूपवतेच्या माध्यमातून पर्याय सापडला असून या लुटारूना त्यांची जागा दाखवून घराणे शाही नष्ट करा तर प्रकाश आंबेडकरांनी शेतकऱ्यांचे नेतृत्व करावे भविष्य नक्कीचं उज्वल होईल.तर अकोले तालुका हा क्रांतीकारी असून यावेळी नक्कीचं क्रांती घडेल.

यावेळी रणरणत्या उन्हात कार्यकर्ते,जेष्ठ नागरिक,वयोवृध्द, महिला,तरुण घोषा बाजी करत रॅली उस्पुर्तपणे सहभागी होवून दोन कि मी पायी चालत होते.बहुजन ऐक्याचे दर्शन वंचितच्या रॅलीतून शिर्डीत दिसून आले.यावेळी संघराज रुपवते,सुशिलाताई रुपवते,दशरथ सावंत,अरुण जाधव,विशाल कोळगे,दिलीप कदम,सुहास राठोड,सचिन बनसोडे,महेश पाखरे,ऋषिकेश जगताप,प्रविण पाळंदे,दिशा पिंकी शेख,निलेश जगधने,चंद्रकांत सरोदे,शांताराम संगारे,बापू रणधीर आदीसह मोठ्या संख्येने मुस्लीम,धनगर, मराठा,बौध्द,आदिवासीसह बहुजन समजतील,महिला,तरुण वर्ग उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *