मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी सिन्नरकर सज्ज; पाच हजार वाहनांचा सहभाग, जेसीबीने उधळणार फुले
मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी सिन्नरकर सज्ज;
पाच हजार वाहनांचा सहभाग, जेसीबीने
उधळणार फुले
सिन्नर प्रतिनिधी
मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली दि.१३ रोजी सिन्नरला सकाळी ११ वा.येणार आहे.या रॅलीच्या नियोजनासंदर्भात येथील शासकीय विश्रामगृहात सकल मराठा समाजाची बैठक झाली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी विलास पांगारकर होते.
नाशिक येथे जात असताना मनोज जरांगे पाटील यांचे सिन्नर शहरात भव्य स्वागत करण्यात येणार आहे.. शहरातील प्रमुख मार्गावरून स्वागत फलक व जरांगे यांचेवर जेसीबीच्या सहाय्याने फुलांची ऊधळण करून त्यांची चार चाकी वाहनांची रॅली यशस्वी करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
या भव्य रॅलीत तालुक्यातील पाच हजार वाहने सहभागी होणार असल्याने रॅली शांततेत पार पाडण्यासाठी स्वयंसेवकांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या.भारत कोकाटे कृऊबाचे सभापती शशिकांत गाडे नामदेव कोतवाल अण्णा,साहेब खाडे अॅड संजय सोनवणे, कैलास निरगुडे, विठ्ठल जपे,काका जाधव यांनी चर्चेत भाग घेऊन विविध सुचना केल्या.
मनोज जरांगे यांच्या रॅलीला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता शेतकऱ्यांना शेतमाल आणण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून जिल्ह्यातील सर्वच बाजार समिती व सिन्नर बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.अशी माहीती सभापती शशीकांत गाडे यांनी दिली.
यावेळी रॅलीच्या यशस्वितेसाठी नियोजन समिती स्थापन करण्यात आली असून नारायण वाजे,शरद शिंदे, भाऊसाहेब शिंदे, बाळासाहेब हांडे,विठ्ठल ऊगले, संपत पगार,संजय चव्हाणके, म्हाळु रानडे, राजाराम मुंगसे, कृष्णा कासार,जगदीश चव्हाणके,दशरथ रोडे,जयराम शिंदे,राजाराम मुरूकुटे,ए टी शिंदे, नामदेव शिंदे,ऊत्तम करडक,हरीभाऊ तांबे, स्वप्निल डुंबरे,सुनिल सोनवणे,मनोज भगत,
अॅड विलास पगार,अॅड योगेश गडाख,अॅड आत्माराम ऊगले,रवींद्र मोगल, अनिल थोरात, शाम कासार, कचरू डावखर,अक्षय ऊगले,ऊमेश गायकवाड,सचीन ऊगले आदींचा समावेश आहे.